Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मागणी मान्य;जळगावला कोरोनाच्या चाचणीसाठी प्रयोगशाळा स्थापन्यास मान्यता

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री                                   ना.गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

कोरोना विरोधी लढ्यास मिळणार गती

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 16 – जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविड-19 विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) स्थापन करण्यास मान्यता मिळाली आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यातील कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी यापूर्वी पुणे, औरंगाबाद, धुळे येथे पाठवावे लागत होते. त्यातच जिल्ह्यात दोन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. ही परि‍स्थिती लक्षात घेऊन 7 एप्रिल रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून पार पडलेल्या राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील रूग्णांची तातडीने तपासणी होण्यासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना तपासणी लॅबची मागणी केली होती. पालकमंत्र्यांची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लगेचच तत्वत: मान्य केली होती व लवकरात लवकर प्रस्ताव पाठविण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय महाविद्यालयाने परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन तो शासनास सादर केला होता.
त्यानुसार शासनाने हा प्रस्ताव मान्य केला असून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे कार्यासन अधिकारी अ. मु. डहाळे यांनी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक यांना पत्राद्वारे कळविले आहे की, या विभागाच्या नियंत्रणाखालील राज्यातील सहा शासकीय रूग्णालयांमध्ये विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा स्थापित करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे. यामध्ये जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह बारामती, कोल्हापूर, गोंदिया, नांदेड आणि आंबेजोगाई (जि. बीड) येथे आता कोविड-19 तपासणीसाठी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) स्थापन करण्यास मान्यता प्रदान केली आहे. कोरोना चाचणीसाठी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. यासाठी संस्थेस (राज्ययोजनेतंर्गत/जिल्हा वार्षीक योजना, स्वीय प्रपंची खाते व महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत उपलब्ध निधी इ.) उपलब्ध होणाऱ्या निधीतून करावा असे म्हटले आहे. त्याचबरोबर या प्रयोगशाळेसाठी लागणारी आवश्यक सामग्री ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित करण्यात आलेल्या समितीच्या मान्यतेने व शिफारशीनुसार करण्यात यावी असेही म्हटले आहे.
कोरोना चाचणीची सुविधा जळगावात उपलब्ध झाल्यामुळे आता जिल्ह्यातील संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी धुळे, औरंगाबाद येथे न पाठविता जिल्ह्यातच रूग्णांचे निदान करता येणार असल्याने वेळ वाचणार असून निदान झाल्यामुळे रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. जळगावातच कोरोनाची चाचणी उपलब्ध झाल्याने कोरोना विरोधी लढ्यास चांगले बळ मिळणार असल्याचे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आनंदाची बातमी : कोरोनाशी युद्ध जिंकणाऱ्यांमध्ये चिमुकल्यापासून ते आज्जीबाईंचा समावेश

Next Post

नेहरु युवा केंद्राच्या वतीने गोर-गरिबांना जिवनावश्यक साहित्याचे वाटप

Next Post
नेहरु युवा केंद्राच्या वतीने गोर-गरिबांना जिवनावश्यक साहित्याचे वाटप

नेहरु युवा केंद्राच्या वतीने गोर-गरिबांना जिवनावश्यक साहित्याचे वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo