Monday, August 10, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शहरातील शिवभोजन केंद्रांचा शुभारंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव- (जिमाका वृत्तसेवा) :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवभोजन योजनेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.

                जळगाव जिल्ह्यात आजपासून शिवभोजन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. याअंतर्गत शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील शिवभोजन केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आले. 

            याप्रसंगी शहराचे आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त उदय टेकाळे, पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी आदि उपस्थित होते.

            यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, राज्य शासनाने राज्यातील गरीब व गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याची महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर जळगाव जिल्ह्याच्या मुख्यालयी दर दिवशी सातशे भोजन थाळींची मर्यादा आहे. शहरात आठ ठिकाणी नऊ केंद्र सुरु करण्यात येणार आहे. या केंद्रामुळे जिल्ह्याच्या मुख्यालयी येणारे शेतकरी, शेतमजूर, रुग्ण, गरीब नागरिकांना अल्पदरात भोजनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून राज्य शासनाने शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे कमी पैशात दर्जेदार भोजनाची सुविधा आता उपलब्ध होणार आहे. शिवभोजन चालकास ग्राहकांकडून 10 रुपये, तर शासनाकडून प्रति थाळी 40 रुपयांचे अनुदान देण्यात येईल. आगामी काळात मागणीनुसार थाळींची संख्या वाढविण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.  शहरातील ही शिवभोजन केंद्रे दुपारी 12 ते 2 या कालावधीत सुरू राहतील. या भोजनात दोन चपाती, एक वाटी भाजी, एक मूद भात, एक वाटी वरणाचा समावेश आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेच्या चित्ररथास पालकमंत्र्यांनी दाखविली हिरवी झेंडी

Next Post

जळगाव महापौरपदी भाजपच्या भारती सोनवणे बिनविरोध

Next Post

जळगाव महापौरपदी भाजपच्या भारती सोनवणे बिनविरोध

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo