Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाळधीत ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रा.पं. स्वच्छता कर्मचारी व आशा वर्कर सन्मानित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/11/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
पाळधीत ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रा.पं. स्वच्छता कर्मचारी व आशा वर्कर सन्मानित

पाळधी/धरणगाव(प्रतिनिधी)- येथे दिवाळी भाऊबीज निमित्ताने पाळधी शहरातील ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी यांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल, मिठाई बॉक्स महिला कर्मचाऱ्यांना साडी देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मान सोहळा अखिल भारतीय जिवा सेनेचे तालुका उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे धरणगाव तालुकाध्यक्ष गोपाळराव सोनवणे यांनी आयोजित केला होता. कोरोना कालखंडात पाळधी शहरातील आरोग्य प्रशासनासोबत जीवाची पर्वा न करता कर्मचाऱ्यांनी फवारणी, परिसर सील करणे, गावात स्वच्छता राखणे अशी जबाबदारी कर्तव्यात कसूर न करता पूर्ण केल्याने ते सन्मानास पात्र ठरले. यावेळी पाळधी शहरातील आशा वर्कर यांना रुग्ण कल्याण समिती सदस्य दिपकराव सावळे यांनी. ना गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कोरोना योद्धा प्रमाणपत्र पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार केला वर्ल्ड व्हिजन संस्थेने सर्वांना मास्क वाटप केला. व्यासपीठावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह धरणगाव पंचायत समिती सभापती मुकुंदराव नन्नवरे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पाळधी बुद्रुकचे सरपंच प्रकाश पाटील, उपसरपंच चंदन कळमकर, पाळधी खुर्द चे सरपंच चंदू माळी, उपसरपंच अनिल कासट, श्रीराम ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष शरदचंद्र कासट, उद्योगपती दिलीप पाटील, माजी सभापती राजू पाटील, डेप्युटी सुरेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य धर्मेन्द्र कुंभार, किशोर सोनवणे अखिल भारतीय जिवा सेनेचे जिल्हाध्यक्ष देविदास फुलपगार, किरण नांद्रे, जिल्हा संघटक भगवान मराठे, भूषण महाजन, अलीम देशमुख, दीपक झंवर, एपीआय हनुमंतराव गायकवाड यासह इतर मान्यवर उपस्थित होते.  पालकमंत्र्यांच्या हस्ते झालेल्या गौरवाने ग्रामपंचायत कर्मचारी व अशा वर्कर यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा सेनेचे शिवाजी पाटील, मुकेश भोई, दीपक श्रीखंडे, हिम्मत कुंभार, सुभाष कापुरे संतोष सोनवणे, पिंटू कोळी गोकुळ पाटील, बबलू पाटील, सादिक देशमुख, महेंद्र चौधरी, असलम मण्यार, महेश मोरे, शामकांत फुलपगार, नितीन फुलपगार यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन आधार गुरुजी पाटील यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मोबाईलद्वारे माहिती अधिकाराचा अर्ज कसा करायचा ?

Next Post

रेल्वेत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून घ्यावे!

Next Post
रेल्वेत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून घ्यावे!

रेल्वेत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून घ्यावे!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo