Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाळधीला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की;त्या दोघ भावाविरुद्ध गुन्हा दाखल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

पाळधी-(प्रतिनिधी) – गावातील ग्रामपंचायतीजवळ सॅनिटायझर पॉइंटवर नियुक्त कामगाराला दुचाकीची धडक दिली. याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या सहायक पोलिस निरीक्षकाला दुचाकीस्वारासह त्याच्या भावाने अरेरावी तसे शिवीगाळ करत धक्काबुक्की केली व गणवेश फाडल्याची धक्कादााय प्रकार शनिवारी सायंकाळी ६ वाजता पाळधीतच घडला. या प्रकरणी दोघा भावांविरुद्ध शासकीय कामात अडथळासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गावांमध्ये सॅनिटायझर वाईल्ड करण्यात आलेला आहे या ठिकाणी भाईदास माळी या कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास माळी या ठिकाणी कामावर असतांना गावातीलच राहुल गुलाब फुलझाडे हा तरुण विना क्रमांकाच्या दुचाकीवरून भरधाव आला. या दरम्यान माळी यांना दुचाकीची धडक दिली यात माळी जमिनीवर कोसळले. त्यानंतर दुचाकी सॅनिटायझर पॉइंटच्या शिडीवर धडकली. संबंधित प्रकाराबाबत पाळधी दूरक्षेत्र पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एल गायकवाड यांना माहिती मिळाली. संबंधित प्रकाराबाबत गायकवाड यांनी अपघातात जबाबदार राहुल फुलझाडे यास जाब विचारला असता त्याने गायकवाड यांना अरेरावी करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर घटनास्थळी राहुलचा भाऊ सचिन गुलाब फुलझाडे हाही धावुन आला. गायकवाड यांच्या अंगावर धावून जात त्याने शर्टाची कॉलर पकडली यानंतर धक्काबुक्की करत गणवेशावरच नंबर प्लेट तोडुन गणवेश फाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या प्रकारानंतर राहुल फुलझाडे याने पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या जिन्याच्या लोखंडी गेटला डोके तसेच हात आपटुन स्वतःला जखमी करून घेतले . यानंतर पोलिसांना बघून घेऊ अशी धमकी देत दोघेही घटनास्थळावरून पसार झाले . याप्रकरणी राहुल गुलाब फुलझाडे व सचिन गुलाब फुलझाडे या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

संतांच्या हत्ये प्रकरणी हल्लेखोरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा -महामंडलेश्वर

Next Post

पतंजली ने आणले नवीन सिमकार्ड

Next Post
पतंजली ने आणले नवीन सिमकार्ड

पतंजली ने आणले नवीन सिमकार्ड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d