Friday, June 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पुणे ‘स्मार्ट सिटी वॉर रुम’ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
पुणे ‘स्मार्ट सिटी वॉर रुम’ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

● डॅश बोर्ड प्रणालीची जाणून घेतली माहिती

● कोराना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करा; निधी कमी पडू देणार नाही

पुणे, दि.२२ : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अंतर्गत कार्यन्वित केलेल्या वॉर रुम (डॅश बोर्ड) प्रणालीची कार्यपद्धती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी जाणून घेतली व उपयुक्त सूचना केल्या.

Maha Info Corona Website

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने ही प्रणाली विकसीत केली आहे. याठिकाणी अत्याधुनिक संगणकीय प्रणाली आहे. कोरोनाबाधित रुग्ण, शहरातील कोरोनाबाधित क्षेत्र, वाढत असलेला परिसर याबाबतची अद्ययावत माहिती याठिकाणी मिळते. त्यामुळे उपाययोजना करणे सोपे जाते. अगदी सुरूवातीपासूनची माहिती याठिकाणी मिळू शकते, अशी माहिती मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी यावेळी दिली.

अपर आयुक्त रुबल अग्रवाल अधिक माहिती देताना म्हणाल्या, या ठिकाणी निरंतर काम चालू असते. शिवाय बेडची उपलब्धता, भविष्यात लागणारे बेडस्, डॉक्टरांची संख्या या डॅश बोर्डवर पाहायले मिळते, त्यामुळे तात्काळ कार्यवाही करणे सोपे जाते.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अपर आयुक्त शांतनु गोयल, आरोग्य प्रमुख डॉ.रामचंद्र हंकारे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले, ही प्रणाली उत्तम आहे. एखाद्या कोरोनाबाधित नागरिकाचा फोन आला तर तत्काळ रुग्णवाहिका पोहोचली पाहिजे. भविष्याच्या दृष्टिकोनातून बालेवाडी प्रमाणे अन्य ठिकाणी कोव्हिड सेंटर कार्यान्वित केले पाहिजे.

यावेळी त्यांनी पहिला रुग्ण बरा झाल्यानंतर पुन्हा त्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना लागण झाली काय, यावर आयुक्तांनी तसे झाले नाही. आपण त्यांच्या सतत संपर्कात असतो. रोज चार ते साडेचार हजार लोकांना फोन केला जातो, असे सांगितले.

डॉक्टर, रुग्ण वाहिकांची उपलब्धता याबाबतची माहिती घेताना निधी लागत असेल तर मागणी करा, लगेच उपलब्ध करून देता येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘इंडियन ब्रॉडकास्टर्स’समवेत बैठक

Next Post

मनरेगाच्या माध्यमातून विभागात ७५ हजार मजूरांच्या हाताला काम

Next Post
मनरेगाच्या माध्यमातून विभागात ७५ हजार मजूरांच्या हाताला काम

मनरेगाच्या माध्यमातून विभागात ७५ हजार मजूरांच्या हाताला काम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo