Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पोलिस दलाच्या प्रदर्शनास विद्यार्थ्याचा उत्स्फुर्त प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(जिमाका)- महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दल, भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस दलातील विविध विभागाच्या साहित्याचे प्रदर्शन आज शहरातील काव्यरत्नावली चौकात भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके, पोलीस उप अधिक्षक नीलभ रोहण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अनिल बडगुजर, राखीव पोलीस दलाचे पो. नि. सुभाष कावरे, पोलीस बँड पथकाचे मेजर सलिम खान, युवाशक्ती फाऊंडेशनचे विराज कावडीया आदि उपस्थित होते. या प्रदर्शनाला शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त हजेरी लावली होती. या प्रदर्शनात श्वान पथक, बाँम्ब शोध व नाशक पथक, बिनतारी संदेश पथकाच्या साहित्याचे प्रदर्शन लावण्यात आले होते. यावेळी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट देऊन तेथील साहित्याची माहिती करुन घेतली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर प्रबोधिनीमार्फत महाविद्यालयीन प्रश्नमंजूषा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

Next Post

पीक कर्ज घेतलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांनी कर्जखात्याशी आधार नंबर जोडणे अनिवार्य

Next Post

पीक कर्ज घेतलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांनी कर्जखात्याशी आधार नंबर जोडणे अनिवार्य

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo