Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रजासत्ताकदिनी आयोजित ग्रामसभांमध्ये घेतली जाणार कुष्ठरोग पीडीत व्यक्तीबरोबर भेदभाव करणार नसल्याची प्रतिज्ञा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(जिमाका वृत्तसेवा) :- प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये कुष्ठरोग व क्षयरोग निर्मूलनविषयी सर्व उपस्थितांनी कुष्ठरोग व क्षयरोग पीडीत व्यक्तीबरोबर कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. सामाजिक भेदभाव होणार नाही यासाठी मी कटिबद्ध राहून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे कुष्ठरोग मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील. अशी प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री प्रगती योजनेतंर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमामध्ये स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान-2020 निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटोळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जयवंत मोरे, महानगरपालिकेचे क्षयरोग अधिकारी डॉ. रावलाणी, अशा समन्वयक श्री. जगताप, आरोग्य विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, श्री. किशोर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिनिधी आदि उपस्थित होते. या अभियानात जिल्हा आरोग्य विभाग, जळगावतंर्गत 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी, 2020 पर्यंत कुष्ठरोग व क्षयरोग निवारण पंधरवाडा संपूर्ण जिल्ह्यात साजरा करण्यात येत आहे. हा कार्यक्रम राबविण्याविषयी आरोग्य विभागाने केलेल्या नियोजनाची माहिती डॉ. इरफान तडवी, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा कुष्ठरोग विभाग, जळगाव यांनी बैठकीत सविस्तररित्या दिली. या पंधरवाडयात कुष्ठरोग व क्षयरोग विषयी ग्राम पातळी व शहरी भागात जनजागृती करुन समाजातील लपुन राहिलेले कुष्ठरोगी व क्षयरोगी लवकरात लवकर विकृती विना शोधुन त्वरीत औषोधोपचार खाली आणणे, नवीन संसर्गात कुष्ठ व क्षय रोगी शोधुन त्यांना औषोधोपचाराखाली आणुन संसर्गाची साखळी खंडीत करणे, कुष्ठरोग व क्षयरोग दुरीकरनाचे ध्येय साध्य करणे. याबाबत प्रयत्न करण्यात येणार आहे.

            या उपक्रमातंर्गत 30 जानेवारी या महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने कुष्ठरोग निवारण दिन साजरा करणे. बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी कुष्ठरोग व क्षयरोग या आजाराविषयी जिल्ह्यातील सद्य:स्थितीतील माहिती जाणून घेतली व मौलिक सुचना केल्यात. या पंधरवाड्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात जास्तीत जास्त ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याकरिता अशा वर्कर यांचा सहभाग घ्यावा. 12 फेब्रुवारी, 2020 रोजी सर्व आशावर्कर यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील शाळेत जाऊन कुष्ठरोग व क्षयरोग या आजाराविषयीची लक्षणे व उपचार याबाबत पोस्टर वाटुन समाजात जनजागृती करण्याबाबात सुचनाही दिल्यात.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मतदार यादीतील नावाची मतदारांनी पडताळणी करण्याचे आवाहन

Next Post

अशोक पारधे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

Next Post

अशोक पारधे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo