Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फैजपूर येथे ८ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण; कोरोना बधितांची संख्या १९ वर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
‘कोविड-१९’शी सामना करायचाय? आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार करू शकता

फैजपूर(किरण पाटील)-  शहरातील कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला असून दि.१३ जून रोजी तब्बल ८ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून याला प्रशासनाने दुजोरा दिला आहे. संसर्ग रूग्णांच्या परिसरात फवारणीसह सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाला प्राप्त झालेल्या आवाहलात ८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात एका कोरोना योद्धा पोलिसाचा व एका ८ वर्षीय लहान बालिकेचा समावेश आहे. त्यामुळे फैजपूर येथील कोरोना बधितांची संख्या १९ वर गेली आहे. यातील ४ जण हे उपचार घेऊन घरी परतले आहे. त्यामुळे सद्यास्थितीत १५ बधितांवर उपचार सुरू आहे. शहरात प्रथमच ८ ने रुग्ण संख्या वाढली असून ही वाढती रुग्ण संख्या शहर व प्रशासनला चिंतेचा विषय बनला आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये चार रुग्ण हे पूर्वीच्या बधितांच्या संपर्कातील असून चार हे नवीन भागातील त्यामध्ये एका कॉरोनायोध्दा पोलिसचा समावेश आहे. फैजपूर शहरातील कंटेनमेंट झोनची संख्या ही ९ झाली आहे. शहरात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घरा बाहेर पडू नये, मास्क चा वापर करावा, सतत हात धुवावे किंवा सॅनिटीझर चा वापर करावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. सदर प्रशासनिय अधिकारी फैजपूर प्राताधिकारी डॉ.अजित थोरबोल, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सर्कल जी.डी. बंगाळे, तालाठी प्रशांत जावळे सह कर्मचारी व फैजपूर पोलीस स्टॅफ, होमगार्ड हे जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावीत आहे. शहरातील नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन सतत करीत आहे.  प्रशासनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक दंडात्मक कार्यवाही करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांन कडून केली जात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नोबल इंटरनॅशनल स्कूल तर्फे आर्सेनिक अल्बम३० या गोळ्यांचे वाटप

Next Post

उल्का फाऊंडेशन मार्फत मोफत “चित्रकार” नोंदणी सुरू

Next Post
उल्का फाऊंडेशन मार्फत मोफत “चित्रकार” नोंदणी सुरू

उल्का फाऊंडेशन मार्फत मोफत "चित्रकार" नोंदणी सुरू

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo