Thursday, August 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

जैन इरिगेशनमध्ये जागतिक छायाचित्र दिन साजरा

Desk Team by Desk Team
20/08/2026
in विशेष
Reading Time: 1 min read
फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

जळगाव, दि. १९ (प्रतिनिधी) – – ‘फोटोग्राफी म्हणजे केवळ क्षण टिपणे नव्हे, तर हरवलेल्या आठवणी पुन्हा जिवंत करण्याची जादू व ताकद आहे.’ असे प्रतिपादन जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी जागतिक फोटोग्राफी दिनाच्या औचित्याने केले. जैन हिल्स येथील कांताई कार्यालयात त्यांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले. त्याच सोबत उपस्थित छायाचित्रकारांना शुभेच्छा दिल्या.

फोटोग्राफी हा चांगला व्यवसाय आहे. असे सांगत फोटो आणि व्हिडिओमुळे जगभरातील लोक एकमेकांशी जोडले गेले असून, खऱ्या फोटोग्राफरने क्षणासोबतच त्यामागील भावनाही कॅमेऱ्यात टिपली पाहिजे असे सांगून या नकारात्मक जगात सकारात्मकता दाखविणारे फोटो मनाला आनंद देणारे ठरतात. गुगलवर हव्या त्या विषयाचे फोटो आपण शोधून मिळवू शकतो. आपल्या जैन हिल्स व जैन फूडपार्क येथे निसर्गाने नटलेला हा परिसर छायाचित्रांसाठी चांगला आहे. निसर्गाचे संदर्भ छायाचित्र कुणाला हवे असेल तर आपल्याकडे काढलेल्या छायाचित्राचा उपयोग व्हावा अशी कलात्मक नजर विकसीत करायला हवी असे देखील अनिल जैन यांनी कंपनीच्या छायाचित्रकारांना आवाहन केले.

जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय मोठेभाऊ अर्थात भवरलालजी जैन यांच्याहस्ते कॅमेरा पूजन करून जैन हिल्स येथे जागतिक छायाचित्र दिवस साजरा करण्याची पद्धत सुरू झाली, ती परंपरा आजही सुरू आहे. याप्रसंगी छायाचित्र विभागाचे राजेंद्र माळी, तुषार हरिमकर, योगेश संधानसिवे, समाधान महाजन, हिमांशू पटेल, अभंग जैन, विकास मल्हारा, मनिष शहा, अनिल जोशी, विजय जैन, शिवा तुपे, ज्ञानेश्वर शेंडे, आनंद पाटील, किशोर कुलकर्णी, देवेंद्र पाटील सुनील दांडगे, महेश दांडगे, प्रशांत शिंदे, मुरलीधर बडगुजर आदी सहकारी उपस्थित होते.

Desk Team

Previous Post

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

Next Post

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

Next Post
धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo