Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बर्ड फ्ल्यू संसर्ग रोखण्यासाठी अधिसूचना जारी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
बर्ड फ्ल्यू संसर्ग रोखण्यासाठी अधिसूचना जारी

ठाणे जिल्ह्यात वेहळोली वगळता अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाली नाही

संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यकत्या उपाययोजना – जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

ठाणे, दि. 18 (जिमाका) : ठाणे जिल्ह्यातील मौजे वेहळोली, ता.शहापूर येथे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील 1 कि.मी. त्रिज्येतील क्षेत्र संसर्गक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाली नसून संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे. 

      या संदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी सांगितले की, मौजे वेहळोली, ता.शहापूर जि.ठाणे येथे काही कोंबड्या दगावल्या होत्या. त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवल्यानंतर त्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल काल  प्राप्त झाला. त्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून  बर्ड फ्लूचा संसर्ग जिल्ह्यात इतरत्र कुठेही पसरु नये यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार बर्ड फ्लू बाधित क्षेत्र केंद्रबिंदू मानून 1 कि.मी. त्रिज्येतील परिसर संसर्ग क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रातील पोल्ट्री फार्म मधील कुक्कुट पक्षी, उर्वरित पक्षी खाद्य, अंडी नष्ट करुन त्याची विल्हेवाट लावण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. या भागातील कुक्कुट पक्षांचे जिल्हा पशुसंधर्वन उपायुक्त यांच्या मार्फत शीघ्र कृती दलाच्या माध्यमातून शास्त्रोक्त पद्धतीने प्रभावित पक्ष्यांना नष्ट करण्याची प्रक्रिया करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जोपर्यंत बाधित क्षेत्र संपूर्णत: संसर्गमुक्त क्षेत्र म्हणून घोषित होत नाही. तोपर्यंत या 1 कि.मी. त्रिज्येतील चिकन विक्रेते व वाहतूकदार यांचे दैनंदिन कामकाज रोखण्यात यावे, असे निर्देश अधिसूचनेच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. 

      वेहळोली वगळता जिल्ह्यात अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची घटना नाही. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

इंपीरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये “शिवजयंती ” उत्साहात साजरी

Next Post

जायंटसेल ट्यूमरची ४२ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

Next Post
जायंटसेल ट्यूमरची ४२ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

जायंटसेल ट्यूमरची ४२ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo