Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘बार्टी’ कडून प्रशिक्षण प्राप्त यूपीएससीतील भावी अधिकाऱ्यांचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले कौतुक

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
24/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read

लॉकडाऊन काळातील ऑनलाईन पॅटर्न आत्मसात करून तुम्ही राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलंत; गर्व वाटतो तुमचा!

मुंबई(प्रतिनिधी)- लॉकडाऊन मधला ऑनलाईन पॅटर्न आत्मसात करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व राज्य सरकारच्या मदतीने प्रशिक्षण प्राप्त केलेल्या, अनुसूचित जातीतील 9 विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. सर्व यशस्वी भावी अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व करावे तेवढे कौतुक थोडेच आहे! तुम्हा सर्वांचा गर्व वाटतो, अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बार्टीच्या यूपीएससीत यश मिळवलेल्या 9 विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

बार्टी व राज्य सरकारच्या मदतीने ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन जानेवारी 2021 मध्ये यूपीएससीच्या परीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांपैकी लेखी परीक्षा व त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये यूपीएससी मार्फत झालेल्या मुलाखती व अन्य चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण करून बार्टीच्या 9 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून, हे 9 जण भारतीय सर्वोच्च नागरी सेवेत अधिकारी होणार आहेत.

यामध्ये सुहास गाडे (रँक-349), आदित्य जीवने (रँक-399), शरण कांबळे (रँक-542), अजिंक्य विद्यागर (रँक-617), हेतल पगारे (रँक-630), देवव्रत मेश्राम (रँक-713), स्वप्नील निसर्गन (रँक-714), शुभम भैसारे (रँक-727) आणि पियुष मडके (रँक-732) या भावी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

बार्टी मार्फत दरवर्षी राज्यातील निवडक विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी दिल्ली येथे प्रायोजकत्व देण्यात येते. परंतु मागील काही महिन्यात कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत प्रायोजकत्व देण्याऐवजी ऑनलाईन प्रशिक्षण व अन्य मदत केली जात होती. परीक्षेच्या पूर्वतयारी साठी सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.दरम्यान, विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश आमच्या प्रयत्नांना सार्थक करणारे आहे, या विद्यार्थ्यांनी भावी जीवनात मोठे अधिकारी म्हणून काम करताना देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे. सामान्य व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सतत आपल्या पदाचा सकारात्मक वापर करावा, अशी अपेक्षा व्यक्त करत धनंजय मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Team Satymev Jayate

Previous Post

ऑक्सिजन उत्पादकांसाठी राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे जारी

Next Post

जामनेरातील अवैध धंदे बंद करण्याबाबत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo