Sunday, December 7, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बालकल्याण समिती तात्काळ बरखास्त करण्यासाठी मासूचे सागर बिऱ्हाडे यांचे उपआयुक्तांना निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/01/2024
in राज्य
Reading Time: 1 min read

नाशिक – (प्रतिनिधी) – जळगाव येथील बाल कल्याण समितीतील गुन्हा दाखल असलेल्या तीन सदस्यांना तात्काळ पदमुक्त करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे महाराष्ट्र संघटक सागर बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येईल असा इशारा मासू संघटनेने उपायुक्त यांना निवेदन देत आज दिनांक २ रोजी केला आहे.
सविस्तर असे की,
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ कलम २७ प्रमाणे बाल कल्याण समिती, जळगांव कार्यरत आहे.
मिशन वात्सल्य गाईडलाईन नुसार समिती सदस्यांना तसेच अध्यक्ष यांना प्रत्येक बैठकीस २००० रुपये भत्ता शासनाच्या माध्यमातून दिला जातो. अशा महिनाभरात एकुण २० बैठकांचे रु. ४०,००० /- दरमहा प्रत्येक सदस्यास मानधन प्राप्त होते.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ कलम २७ (७)(१) नुसार जर कोणताही सदस्य या अधिनियमानुसार त्याला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा गैर वापर करत असल्याचे सिद्ध झाल्यास राज्य शासनाकडुन अशा सदस्यांचे सदस्यत्व चौकशी नतंर रद्द केले जाईल, असे सदर अधिनियमात स्पष्ट नमुद आहे. असे असतांना देखील सदर बालकल्याण समितीच्या सदस्यांवर गुन्हा दाखल होऊनही अद्याप त्यांचे निलबंन झालेले नाही.
जळगाव सह राज्यभरात वृत्तपत्रातील प्रसिद्ध झालेल्या बातम्या नुसार सदर जळगाव च्या बाल कल्याण समितीतील तीन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन सदर सदस्यांची राज्य चौकशी समितीद्वारे ऑगस्ट – २०२३ महिन्यातच चौकशी पुर्ण झालेली आहे.
खडके बालगृह अत्याचार प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशन ता. एरंडोल जि. जळगाव येथे दिनांक २६.०७.२०२३ रोजी गुन्हा दाखल झालेला आहे.
खडके बालगृह अत्याचार प्रकरणाची माहिती पिडितांनी अध्यक्ष व दोन सदस्य बाल कल्याण समिती, जळगाव यांना सर्वप्रथम दिली होती.
एरंडोल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होण्याच्या ६ महिने अगोदर या संपूर्ण प्रकरणाची माहिती पिडितांनी बाल कल्याण समिती अध्यक्ष /सदस्य १)अध्यक्ष श्रीमती देवयानी गोविंदवार २) सदस्य श्रीमती विद्या बोरनारे
३)सदस्य श्री. संदिप पाटील
यांना घटनाक्रम माहिती होता.
सदर व्यक्तींवर दाखल गुन्ह्याचा तपशील – भा. द. वि. कलम ३२४,३५४,३७६(२)(n)(क),३२३,५०६, पोस्को कायदा २०१२ अंतर्गत ४,५(फ) (एल) (ओ) ,६,८,९(फ)(एल)(ओ) ,१९,२१,८२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
जळगाव जिल्ह्यातील खडके, ता. एरंडोल येथे संस्थेच्या माध्यमातून खाजगी रित्या चालवल्या जाणाऱ्या कै. य. ब. पाटील, मुलींचे बालगृह, खडके येथील मुलींच्या बालगृहात लैंगिक शोषणाची गंभीर स्वरुपाची घटनेची तक्रार बाल कल्याण समिती, जळगाव येथील तीन अध्यक्ष /सदस्य, अध्यक्ष श्रीमती देवयानी गोविंदवार, सदस्य श्रीमती विद्या बोरनारे व सदस्य श्री. संदीप पाटील यांना पिडीत बालिकांनी ऑगस्ट २०२२ मध्ये सर्व प्रथम सांगितली होती.
परंतु स्वतः ला न्यायपीठ म्हणवणाऱ्या महाशयांनी त्यांना संपुर्ण घटना माहिती होऊन देखील फक्त आणि फक्त आर्थिक लालचेपोटी सदर घटना दाबुन ठेवण्याचा प्रयत्न केला असावा व संबंधित आरोपी यांच्याकडून जेव्हा महाशयांच्या मागणी पुर्ण झाल्या नाहीत किंवा आरोपी हे महाशयांच्या मागण्या पुर्ण करण्यास असमर्थ ठरले असावेत त्यामुळे दिनांक २५/०७/२०२३ रोजी सदर बाब तीनही महाशयांनी बाल हक्क आयोग यांचे समक्ष सर्व प्रथम उघड केली. व त्यानंतर दिनांक २६/०७/२०२३ रोजी पिडीत बालिकांच्या फिर्यादीवरुन एरंडोल पोलीस स्टेशन येथे भा. द. वी. कलम, ३२४,३५४,३७६(२)(n)(क),३२३,५०६, पोस्को कायदा २०१२ अंतर्गत ४,५(फ) (एल) (ओ) ,६,८,९(फ)(एल)(ओ) ,१९,२१,८२ गुन्हा दाखल झालेला आहे.
ज्या बाल कल्याण समितीतील अध्यक्ष व सदस्य यांना या समितीवर पिडीत बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी नियुक्त केलेले असतांना अशा प्रकारे अतिशय गंभीर स्वरुपाची लैंगिक शोषण व अत्याचाराची घटना यांना माहिती होऊन देखील यांनी याची दखल घेऊन संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल केला नाही यावरुन यांच्या कामाची तत्परता व बालकांबाबत असलेली सहानुभूती स्पष्ट होते.
तसे पाहता या अध्यक्ष महोदय व दोन सदस्य यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असतांना यांच्या कामाचा सर्व भोगंळ कारभार जगजाहीर झालेला असतांना अद्याप यांची येथुन हकालपट्टी का होत नाही ? हा मात्र सर्वांसाठीच संशोधनाचा विषय ठरला आहे.

संघटनेच्या प्रमुख मागण्या
१) पोस्को अतंर्गत सर्व प्रथम गुन्ह्याची माहिती असतांना देखील त्याचवेळी गुन्हा दाखल न करता आरोपी कडुन आर्थिक लालचे पोटी सदर बाब अनेक दिवस दाबुन ठेवणाऱ्या महाशय असणारे बाल कल्याण समितीतीचे १)अध्यक्ष – श्रीमती देवयानी गोविंदवार
२) सदस्य – श्रीमती विद्या बोरणार
३) सदस्य – श्री. संदिप पाटील या तिनही माश्यांचे तात्काळ निलबंन करण्यात यावे.
२) बाल कल्याण समितीतील अध्यक्ष /सदस्य ही समिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी.
३) या तीन महाशयांना या पुढे शासनस्तरावर कोणत्याही शासकीय समितीच्या सदस्य पदी नियुक्त करण्यात येवु नये.

या तिन महाशयांनी पदाचा गैरवापर केलेला
आहे त्यामुळेच यांच्यावर
भा. द. वी. कलम ३२४,३५४,३७६(२)(n)(क),३२३,५०६, व पोस्को कायदा २०१२ अंतर्गत ४,५(फ) (एल) (ओ) ,६,८,९(फ)(एल)(ओ) ,१९,२१,८२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
त्यामुळे तात्काळ बाल कल्याण समितीतील अध्यक्ष व दोन सदस्य यांना बालकल्याण समितीच्या पदावरुन तात्काळ पदमुक्त करण्यात यावे अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
संबधित बालकल्याण समितीच्या अध्यक्ष व दोन सदस्य यांच्यावर गेल्या ६ महिन्यापासून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या वतिने आंदोलनाचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. सदर गुन्हे दाखल असलेल्या बाल कल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बरखास्तीची कार्यवाही होण्यास टाळाटाळ होत असेल तर नाईलाजास्तव आम्हाला वेळ प्रसंगी संविधानिक मार्गाने जन आंदोलन, उपोषण व न्यायालयात देखील जावे लागेल याची संबधित प्रशासनाने नोंद घ्यावी. महिला व बाल कल्याण विभागाने पुढील १५ ते २० दिवसात सदर समितीतील अध्यक्ष व दोन सदस्य यांना निलंबित न केल्यास आंदोलन करण्यात येईल असे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे महाराष्ट्र सघंटक सागर बिऱ्हाडे यांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी पदाधिकारी गौरव जानराव, सागर अहिरे उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

बाल कल्याण समितीकडून पैशांची उधळपट्टी;नितीन इंगळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Next Post

श्याम कल्याण बंदिशसह, कथ्थक जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध

Next Post
श्याम कल्याण बंदिशसह, कथ्थक जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध

श्याम कल्याण बंदिशसह, कथ्थक जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात 14 नोव्हेंबर बालक दिन कार्यक्रम संपन्न

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात 14 नोव्हेंबर बालक दिन कार्यक्रम संपन्न

नाशिकात मोकाट कुत्र्यांचा तरुणीवर हल्ला;मनपाचे दुर्लक्ष उघड-नागरिक भयभीत

नाशिकात मोकाट कुत्र्यांचा तरुणीवर हल्ला;मनपाचे दुर्लक्ष उघड-नागरिक भयभीत

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d