Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बैलगाड्या शर्यती राज्यात पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
14/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
बैलगाड्या शर्यती राज्यात पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध

नवी दिल्ली- बैलगाड्या शर्यती हा राज्यातील शेतकऱ्‍यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असल्याची माहिती पशु संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी आज येथे दिली.राज्यात बैलगाड्या शर्यती सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे.

बैलगाड्या शर्यतीसंदर्भात वरिष्ठ अधिवक्ता आणि राज्य शासनाचे वकील यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यासाठी श्री.केदार आज दिल्लीत होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्राने बैलगाडी शर्यत सुरू होण्याबाबत 2017 रोजी कायदा संमत केला होता.

तथापि, त्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर, शासनाने या आदेशास अनुसरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हे प्रकरण विस्तारित बेंचकडे प्रलंबित असून पुढील आठवड्यात याबाबत निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून होण्याची शक्यता आहे. याबाबतच्या सविस्तर चर्चेसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने उपस्थित अधिवक्त्यांशी चर्चा करण्यात आले असल्याचे श्री.केदारे यांनी नमूद केले.देशातील इतर राज्यात तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश आंध्रप्रदेश, पंजाब, गुजरात, छत्तीसगढ येथे आजही बैलगाड्यांच्या शर्यती होत असतात. मात्र मुंबई उच्च न्यायालायाच्या स्थगितीमुळे महाराष्ट्रात शर्यतींना बंदी घालण्यात आली आहे.

ही बंदी उठवावी व बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा राज्यात सुरू व्हाव्यात यासाठी आपण दिल्लीत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.राज्यशासन यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत असून यावर अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावा अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने वरीष्ठ अधिवक्ता म्हणुन ॲङ मुकूल रोहतगी, ॲड. शेखर नापडे आणि ॲड.सचिन पाटील यांची नेमणूक केल्याची त्यांनी माहिती दिली.महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीची 400 वर्षांपेक्षा जुनी पंरपरा आहे. “बैलगाडी शर्यत” हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. शर्यतीसाठी शेतकरी खास खिल्लार जातीचे बैल वापरतात त्यांचे संगोपण करतात. खिल्लार ही महाराष्ट्रातच सापडणारी बैलांची जात आहे.

शर्यती बंद असल्यामुळे खिल्लारच्या खोडांना मागणी बंद झाली, तसेच शर्यती बंद असल्यामुळे गावांच्या जत्रा भरत नाहीत. शेतकऱ्‍यांच्या जीवनातील हा सांस्कृतिक भाग म्हणून याकडे पाहण्यात यावे, अशी मागणीही बैलगाडा संघटनेची असल्याचेही श्री.केदार यांनी यावेळी सांगितले.पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शैलेश येंडे, सहायक आयुक्त डॉ. प्रशात भड आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे राज्याचे प्रतिनिधी रामकृष्ण टाकळकर, संदीप बोदगे हे ही याप्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी राजधानी दिल्लीत आहेत.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राज्यात ऑक्टोबरमध्ये १९ हजार ६४८ बेरोजगारांना रोजगार -कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

Next Post

राजधानीत पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी

Next Post
बाल दिनानिमित्त जवाहर बालभवन तर्फे चित्रकला स्पर्धा संपन्न

राजधानीत पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d