Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांव ; नेहा निलेश मालपुरे यांची N Y C I राज्य उपाध्यक्ष पदी निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/06/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
भडगांव ; नेहा निलेश मालपुरे यांची N Y C I राज्य उपाध्यक्ष पदी निवड

भडगाव – (प्रतिनिधी) – राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी भडगाव येथील नेहा निलेश मालपुरे यांची नुकतीच निवड करण्यात आली. सामाजिक क्षेत्राबरोबरच शैक्षणिक, कला, सांस्कृतिक, पर्यावरण, अशा विविध क्षेत्रातील कामासाठी नेहा मालपुरे यांचं नाव घेतलं जातं. विज्ञान व गणित विषयाच्या विविध शैक्षणिक उपक्रमांसह कला क्षेत्रात त्यांनी जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवलेला असून गणाक्षर कलेसाठी त्यांची विशेष ओळख आहे.

देश पातळीवर सामाजिक, शैक्षिणक, पर्यावरण, युवा सक्षमीकरण अशा विविध स्तरात नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून युवा वर्ग काम करत असतो. जास्तीत जास्त युवा वर्गाने स्वविकासाबरोबर देश विकासाच्या या कार्यात सहभागी व्हावे असे नेहा मालपुरे यांनी सांगितले.

नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आर विमल यांनी निवड केली असून, राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल वाकलकर, महाराष्ट्र राज्याध्यक्ष प्रशांत गुरव, महाराष्ट्र राज्य समिती सदस्य, उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तेजस पाटील तसेच जळगाव जिल्हा अध्यक्ष अनिल बाविस्कर आणि संपूर्ण जळगाव जिल्हा सहकारी सदस्य यांनी निवडीचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. युवा परिषदेच्या राज्य पातळीवरील निवडी संदर्भात नेहाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्या भडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मानवराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश मालपुरे व चित्रा मालपुरे यांची सुकन्या आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बांद्रा शासकीय वसाहतीतील रहिवाशांच्या सदनिकांसाठी भूखंड

Next Post

बहुमत चाचणी उद्याच होणार;सुप्रीम कोर्टाचा निर्णय

Next Post
बहुमत चाचणी उद्याच होणार;सुप्रीम कोर्टाचा निर्णय

बहुमत चाचणी उद्याच होणार;सुप्रीम कोर्टाचा निर्णय

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo