Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगाव येथे क्षत्रीय मराठा परीवारामार्फत पोलीस कर्मचारी , आरोग्य कर्मचारी, समाज सेवक सह , पत्रकारांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
भडगाव येथे क्षत्रीय मराठा परीवारामार्फत पोलीस कर्मचारी , आरोग्य कर्मचारी, समाज सेवक सह , पत्रकारांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान

भडगाव वार्ताहर — जळगाव जिल्हा क्षत्रीय मराठा परीवारामार्फत भडगाव येथे पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचार्यांचा, ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचार्यांचा, समाज सेवक सह पत्रकार बांधवांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र, गुलाबपुष्प प्रमाणपत्र देऊन क्षत्रीय मराठा परीवाराच्या जिल्हा क्षत्रिय मराठा परिवारा तर्फे दि.24 व 25 जुर्ले 2021 रोजी भडगाव पो.स्टेशनला व ग्रामिण रूग्णालयात तसेच पत्रकारीत फ्रॅट वर्क लाइन वर कार्य करणारे व समाज सेवक सह कोरोणा योध्दा म्हणुन सन्मान करण्यात आला,या वेळी संघटनेचे जि.व.स.प्र.अँड भाउसाहेब पा.जि.संपर्क प्र-ईश्वर पा.जि.कार्यकारी प्र-ज्ञानेश्वर भोसले,भडगाव ता.प्र-दिनानाथ पा.भडगाव युवक प्र-वाल्मीक पाटील जि.महीला दक्षता प्रमुख-गिता पाटील इ.मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी P.I .उतेकर साहेब यांनी भडगाव पो.स्टे व ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व पत्रकार समाज सेवक च्या वतीने संघटनेनी त्यांच्या कार्याची दखल घेतली म्हणुन आभार मानले. भडगाव पोलीस स्टेशनला दि. 24 रोजी सायंकाळी ६ वाजता हा कोरोना योद्धा पुरस्कार सन्मानाचा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. कोरोना विषाणु महामारीच्या संकट काळात आपण कर्तव्यनिष्ट राहुन आपल्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी करत असलेले कार्य प्रशंसनीय आहे. कार्याची दखल घेत भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील यांचेसह पोलीस कर्मचार्यांना कोरोना योद्धा म्हणुन सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानीत करण्यात आले.

यावेळी उपस्थित भडगाव तालुका पञकार संघाचे माजी अध्यक्ष, पञकार अशोक परदेशी यांना ही कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी क्षत्रीय मराठा परीवाराचे जिल्हाअध्यक्ष अॅड. भाऊसाहेब पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख ईश्वर पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले, भडगाव तालुकाअध्यक्ष दिनानाथ पाटील, युवक अध्यक्ष वाल्मीक अहिरे आदि पदाधिकार्यांनी पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, पत्रकार अशोक परदेशी यांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देउन सन्मान केला. या कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचलन क्षत्रीय मराठा परीवाराचे जिल्हाअध्यक्ष अॅड. भाऊसाहेब पाटील यांनी केले. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी मनोगतातुन सांगीतले कि, कोरोना काळात पोलीस कर्मचार्यांनी जीवाची पर्वा न करता अथक परीश्रम घेतले.

जनतेची काळजी घेतांना बंदोबस्तादरम्यान माझ्यासह काही पोलीस कर्मचारीही कोरोना बाधीत झाले. मात्र पोलीस प्रशासनाच्या कर्मचार्यांची दखल घेत आमचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देउन सन्मान करण्यात आला. याबद्दल भडगाव पोलीस स्टेशनमार्फत क्षत्रीय मराठा परीवाराचे आभार मानतो. असे सांगीतले. तर पोलीस नाईक प्रल्हाद शिंदे यांनी आभार मानले.

भडगाव ग्रामीण रुग्णालयात आरोग्य कर्मचारी व पत्रकार बांधवांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन केला सन्मान — भडगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकीय अधिकारी डाॅ. पंकज जाधव यांचेसह आरोग्य कर्मचार्यांचा तसेच पत्रकार बांधवांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र , गुलाबपुष्प देऊन पदाधिकार्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हा छोटीखानी कार्यक्रम दि. 25 रोजी सकाळी ११ वाजता पार पडला. या वेळी पत्रकार राजु शेख,अशोक परदेशी,हेमंत विसपुते,जावीद शेख,भास्कर शार्दुळ, समाज सेवक महेंद्र ततार,हिरामण बाविस्कर यांना ही कोरोना योध्दा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.तसेच तालुक्यातील सर्वच पत्रकारांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भगवान मराठे तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्त

Next Post

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कारगिल विजय दिवस साजरा

Next Post
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कारगिल विजय दिवस साजरा

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कारगिल विजय दिवस साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo