Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भविष्यातील पूरसदृष्य परिस्थिती टाळण्यासाठी नदीच्या उत्खननासंदर्भात अहवाल तातडीने सादर करावा -महसूल मंत्री

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
10/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
‘एक हात मदतीचा’ कुटुंबांना धीर देणारा ठरेल -महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई(प्रतिनिधी)- महाड परिसरात भविष्यात पुरामुळे दुर्घटना तसेच वित्त आणि मनुष्यहानी होऊ नये यासाठी जलदगतीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. सावित्री नदीच्या पात्रातील दगड, माती आणि वाळू उत्खनन करण्यासंदर्भात तेथील परिसराचे पर्यावरणीय दृष्टीकोनातून सर्वेक्षण करून तातडीने त्याचा अहवाल पर्यावरण विभागाच्या मान्यतेसह सादर करावा, गाळ काढण्याचे काम कालमर्यादेत पूर्ण करावे, असे निर्देश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.

महसूल मंत्री श्री. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सावित्री नदीच्या पात्रातील वाळू-दगड उत्खननाबाबतच्या कामाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भविष्यातील मनुष्यहानी व वित्तहानी टाळण्यासाठीच्या दृष्टीने जलदगतीने कार्यवाही करण्याचे निर्देश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी बंदरे विकास विभागाचे मंत्री अस्लम शेख, माजी आमदार हुस्नबानो खलीफे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे संचालक श्री. टोके, मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी, कोकणचे विभागीय आयुक्त विलास पाटील हे उपस्थित होते. याचबरोबर पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडचे जिल्हाधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

महसूलमंत्री श्री. थोरात म्हणाले, या वर्षी सावित्री नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात दगड, माती, वाळूचा गाळ असल्याने तेथे पाणी साचून ते महाड शहरामध्ये जाते यामुळे मोठ्या प्रमाणात वित्त व मनुष्यहानी होते. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी या भागाचे पर्यावरणीय दृष्टीकोनातून सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करावा. याचबरोबर गाळ उपसण्याच्या कामास गती द्यावी. आपत्ती टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या या कामासाठी सर्व विभागांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून व सहकार्याने काम करणे गरजेचे असल्याचेही मंत्री श्री. थोरात यांनी यावेळी सांगितले. नदी पात्रातील गाळ काढण्यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेथील स्थानिकांना सांगितले होते. या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा, असेही मंत्री श्री. थोरात यांनी सांगितले.

Team Satymev Jayate

Previous Post

विधानसभा उपाध्यक्षांनी जितेश अंतापूरकर यांना दिली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

Next Post

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले

Next Post
भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्याकरिता प्रादेशिक निवड समितीची स्थापना

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 'हे' महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo