Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भांडण विकोपाला: धारदार शस्त्राने वार करून पत्नीची हत्या,पती अटकेत!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/08/2025
in जळगाव
Reading Time: 1 min read
भांडण विकोपाला: धारदार शस्त्राने वार करून पत्नीची हत्या,पती अटकेत!

लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव -(प्रतिनिधी – ईश्वर खरे)-लोहारा येथील पाचोरा रोडवर राहणाऱ्या एक तरुण पतीने गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात चारित्र्याच्या संशयावरून पतीने धारदार शस्त्राने वार करून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दि. १९ ऑगस्ट रोजी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला अटक करण्यात आली आहे.
संशयित आरोपी नितीन दौलत शिंदे (वय ३५, रा. पाचोरा रोड, राममंदिरा समोर, लोहारा ता.पाचोरा) याला अटक झाली आहे. तर अर्चना उर्फ कविता नितीन शिंदे (वय ३२) असे मयत पत्नीचे नाव आहे.
त्यांच्या पश्चात १ मुलगा व १ मुलगी असा परिवार आहे.
याबाबत मयताचा भाऊ आकाश कडूबा सपकाळ (रा. शिवणा ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर) याने माहिती दिली की, माझी बहिण अर्चना उर्फ कविता शिंदे हिची सासु व पती नितीन शिंदे हे चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण व शिवीगाळ करीत होते. तसेच तुझ्या माहेरच्या लोकांनी जमीन विकलेली आहे.
त्यांच्याकडून घर बांधण्यासाठी १० लाख रुपये मागत होते आणि सतत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मानसिक व शारीरिक छळ करीत होते.
मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पत्नी अर्चना उर्फ कविता शिंदे गाढ झोपेत असताना चारित्र्याच्या संशयावरून पती नितीन शिंदे यांने घातक शत्र्यांने वार करून हत्या केली.
घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक अरुण आव्हाड, स.पो.नि. कल्याणी वर्मा फौजदार अरविंद मोरे यांचेसह पोलीस यंत्रणा आली. सदर मयताचा पती नितीन शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात सतत खुनाच्या घटना घडत असल्याने समाजमन सुन्न झाले आहे.
मयत अर्चना नितीन शिंदे ह्या मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवीत होत्या. तसेच त्या धार्मिक होत्या. त्यांच्या पश्चयात असणाऱ्या त्या कोवळ्या बालकांचे काय? आई देवाघरी,तर बाप जेलवारी!! या विचाराने गावकरी ही सुन्न झाले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कार्यकारी अभियंता यांनी ५ % तपासणी केलेल्या कामांची माहिती कोणाच्या कपाटात ?

Next Post

जलतारा योजनेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कासमपुरा ग्रामपंचायतीचा गौरव

Next Post
जलतारा योजनेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कासमपुरा ग्रामपंचायतीचा गौरव

जलतारा योजनेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कासमपुरा ग्रामपंचायतीचा गौरव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo