Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भाऊ झाला भावालाच परका; रुग्णाला मिळाला “बेघर केंद्रा”चा आधार

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
08/01/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read
भाऊ झाला भावालाच परका; रुग्णाला मिळाला “बेघर केंद्रा”चा आधार

जळगाव(प्रतिनिधी)- ‘आपला भाऊ रुग्णालयात दाखल आहे. येऊन भेटा’ असे निरोप देऊनही सख्या भावाने पाठ फिरवली. तरीही महिनाभर रुग्णाला उपचार सुरु ठेवत त्याला वैद्यकीय पथकाने पूर्ण बरे केले. अखेर, कोणीच नातेवाईक न आल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने महानगरपालिकेच्या शहरी बेघर निवारा केंद्राशी संपर्क साधला. शनिवारी दि. ८ जानेवारी रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत या ‘बेवारस’ रुग्णास रुग्णालयातून निरोप देण्यात आला.

प्रमोद जोशी (वय ५५, रा. खोटे नगर, जळगाव) असे या रुग्णाचे नाव आहे. त्यांना ४ डिसेंबर रोजी प्रकृती अस्वास्थामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. कक्ष क्र. ७ येथे महिनाभर उपचार झाल्यावर त्यांना शनिवारी रुग्णालयातून निरोप देण्यात आला. महिन्यातून अनेक वेळा त्यांच्या भावाशी व इतर नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना घेऊन जा असा निरोप देण्यात आला.

मात्र अखेरपर्यंत कोणीही न आल्याने त्यांना शहरी बेघर निवारा केंद्रात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार निवारा केंद्राचे तंत्रज्ञ व्यवस्थापक गायत्री पाटील यांचेशी संपर्क साधून त्यांच्या ताब्यात रुग्णाला देण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर, डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. विपीन खडसे, समाजसेवा अधिक्षक संदीप बागुल, मनपाच्या तंत्रज्ञ व्यवस्थापक गायत्री पाटील, शहरी बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी, काळजीवाहक राजेंद्र मराठे, काळजी वाहक दिलीप चौधरी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचा “संघर्ष दिव्यांग मित्र पुरस्कार” देऊन सन्मान

Next Post

कोरोनानंतर आणखी एक जीवघेणा व्हायरस; इथे आढळला खतरनाक RHDV2

Next Post
कोरोनानंतर आणखी एक जीवघेणा व्हायरस; इथे आढळला खतरनाक RHDV2

कोरोनानंतर आणखी एक जीवघेणा व्हायरस; इथे आढळला खतरनाक RHDV2

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d