Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भानखेडा, विचवा शाळेतून अंतर्नादच्या ‘एक दुर्वा समर्पणाच्या’ उपक्रमास सुरुवात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/08/2022
in सामाजिक
Reading Time: 1 min read

बोदवड तालुक्यातील १०४ विदयार्थ्याना शालेय साहित्य वाटप

भुसावळ -(प्रतिनिधी) – अंतर्नादने सामाजिक भान जपून एक दुर्वा समर्पणाची हा उपक्रम हाती घेतला आहे.यंदा उपक्रमाचे सहावे वर्ष आहे. त्यात समाजातील जास्तीत जास्त घटकांनी सहभागी हाेऊन गरजू विदयार्थ्याना मदतीचा हात देणे अपेक्षित आहे. उपेक्षित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी असे उपक्रम निश्चितच पुरक ठरतील. अंतर्नाद प्रतिष्ठान राबवत असलेला ‘एक दुर्वा समर्पणाची उपक्रम समाजासाठी आदर्शवत उपक्रम आहे असा सुर बोदवड तालुक्यातील भानखेडा आणि विचवा शाळेत मान्यवरांनी व्यक्त केला.

अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे गणेशाेत्सवात ‘एक दुर्वा समर्पणाची’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात बुधवारी बोदवड तालुक्यातील भानखेडा आणि विचवा येथील जिल्हा परिषद शाळे मधे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. वाचन ही जीवन समृद्ध करणारी कला आहे. ती विद्यार्थी दशेत आत्मसात करणे सुलभ हाेते. अंतर्नादने गरज ओळखून जाे उपक्रम राबवला आहे, ताे पथदर्शी आहे, असे समन्वयक ज्ञानेश्वर घुले यांनी नमूद केले. प्रमुख पाहुणे म्हणून भानखेडा येथे सरपंच अनिल मोरे, शा.शि.स.अध्यक्ष अशोक निकम, उपाध्यक्ष उमा सुरवाडे , पो.पा.विठ्ठल निकम, ग्रा.प.स.मुकुंद निकम, मुख्याध्यापक सुभाष इंगळे, तर विचवा जि.प.शाळा येथे शा.व्य.स.अध्यक्ष प्रमोद तायडे, मुख्याध्यापक कविता पाटील यांची उपस्थिती होते.अंतर्नादचे संजय भटकर यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्रकल्पप्रमुख समाधान जाधव यांनी प्रास्ताविक केले.आभार सह समन्वयक देव सरकटे यांनी मानले.

१०४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

उपशिक्षक वैशाली वानरे, उदयसिंग पाटील यांच्यासह ग.स.सदस्य योगेश इंगळे, प्राथमिक शिक्षक सोसायटी संचालक प्रदीप सोनवणे, कुंदन वायकोळे, विक्रांत चौधरी, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांचे सहकार्य लाभले. शाळेतील इयत्ता पहिली ते चाैथीच्या १०४ विद्यार्थ्यांना पाट्या, सचित्र बालमित्र, वह्या, पेन्सील, पाटी पेंसील, पेन असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

अंतर्नादने सामाजिक भान जपून एक दुर्वा समर्पणाची हा उपक्रम हाती घेतला आहे.समाजातील गरीब, गरजू आणि गुणवंत विदयार्थ्याना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न आम्ही करत आहोत.समजातील अनेक दात्यांच्या सकारात्मक सहभागामुळेच या विदयार्थ्याना आम्हाला मदतीचा हात देता येतो असे प्रकल्प प्रमुख समाधान जाधव यांनी नमूद केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जीभेनं चाटून शौचालय स्वच्छ करण्यास भाग पाडलं ; घरात काम करणाऱ्या महिला नोकराचा छळ ; पती,पत्नी अटकेत

Next Post

स्नेहल प्रतिष्ठान यंदाही करणार समाज प्रबोधन, ७ दिवस शिवपुराण, सुंदरकांड, प्रवचनाचे आयोजन!

Next Post

स्नेहल प्रतिष्ठान यंदाही करणार समाज प्रबोधन, ७ दिवस शिवपुराण, सुंदरकांड, प्रवचनाचे आयोजन!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo