Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारतीय संस्कृती टिकविण्यात माळी समाजाचा सिंहाचा वाटा – सचिन भाऊसाहेब गुलदगड 

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
भारतीय संस्कृती टिकविण्यात माळी समाजाचा सिंहाचा वाटा – सचिन भाऊसाहेब गुलदगड 

गुजरात (सुरत)- माळी समाज बांधवासह समाजातील सामाजिक संस्थेने केलेल्या कार्याची दखल महाराष्ट्रात नव्हेतर संपूर्ण देशात दखल घेतली जात असुन भारतीय संस्कृती टिकविण्यात माळी समाजाचा सिंहाचा वाटा आहेत. आज माळी समाजाचे अस्तित्व टिकविण्याची खुप गरज आहेत हे अस्तित्व टिकवायचे असेल तर एकमेंका बाबत असलेले मतभेद बाजुला करुन सर्वांनी एकञ आले तर निश्चितच समाजात एक मोठी शक्ती निर्माण होवु शकते यासाठी सर्व सामाज बांधवांनी  एकञ यावे असे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषन लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी केले. 

गुजरात राज्यांतील सुरत येथे श्री संत सावता माळी युवक संघ, कार्यक्षेत्र भारत या संघटनेच्या १७ व्या वर्धापन दिन साजरा करुन या दिनानिमित्ताने आयोजित विस्तार सभा आयोजित केली होती त्यावेळी सचिन भाऊसाहेब गुलदगड बोलत होते. 

यावेळी राष्ट्रीय सचिव समाजभूषन सुनिल गुलदगड, शेखर व्यवहारे, सुरत येथील नगरसेवक यशवंत महाजन, मधुकर महाजन, मुरली माळी, गुजरातमधील वापीचे विठ्ठल खरात, अहमदाबादचे रामदास सोनवणे, बडोद्याचे चौधरी, अरुण पवार,आदी मान्यवर उपस्थितीत होते. 

यावेळी गुलदगड यांनी पदाधिकारी यांची निवडी जाहिर केल्या असुन गुजरात प्रदेशाध्यक्षपदी सुरत येथील डॅा.राजेश महाले यांची निवड केली तर करुन तसे नियुक्तीपत्र महालेंना देण्यात आले,तसेच सुरत जिल्हाच्या संघटक पदी वाल्मिक महाजन, संपर्क प्रमुखपदी विलास माळी, सोशल मिडीयाप्रमुख पदी मनोज महाजन , सुरत शहराध्यक्ष पदी हरीष पगारे ,आदिंच्या निवडी यावेळी करुन त्यांना नियुक्तीपत्र उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. 

यावेळी मार्गदर्शन करतांना सचिन भाऊसाहेब गुलदगड म्हणाले की, माळी समाज संपुर्ण भारतात विखुरलेला आहे महाराष्ट्रात माळी, गुजरातमध्ये रामी माळी , दिल्ली राजस्थान मध्ये सैनी, मध्यप्रदेश, झारखंड मध्ये कुशवाह,उत्तरप्रदेश मध्ये मौर्य, जम्मु काश्मिर मध्ये शाक्य,आदि अशा अनेक नावाने माळी समाज हिंदुस्थानाला परीचित आहे. माळी समाजाने आत्ता एक पाऊल पुढे टाकत पोटजाती विसरुन माळी म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे. पोटजात विसरुन केवळ माळी म्हणुन विवाह लावले पाहिजेत.माळी म्हणुन एकमेकांबद्दल आपुलकी आणि आदर दाखवला पाहिजे. समाजात जर कोणी अडचणीत असेल तर आपण सर्वांनी त्याची अडचण सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माळी समाजाने संत सावता महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, शुरसिंह राजा सैनी, राजा सम्राट अशोक असे अनेक संत,महापुरुष, राजे देशाला दिले आहेत , त्यांचा वारसा चालविणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचे शेवटी श्री. गुलदगड म्हणाले. यावेळी उपस्थितीत मान्यवरांनी देखील समाज बांधवांना विशेष मार्गदर्शन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

NEET PG परीक्षेत डाँ वृशाली पाटील हिचे सुयश

Next Post

वैशाली विसपुते यांची जळगाव जिल्हा महिला व बाल कल्याण समिती सदस्यपदी निवड

Next Post

वैशाली विसपुते यांची जळगाव जिल्हा महिला व बाल कल्याण समिती सदस्यपदी निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo