Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगर तर्फे मोटरसायकल मशाल तिरंगा रॅली संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/08/2022
in राजकारण
Reading Time: 1 min read


जळगाव – भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश मार्फत देण्यात आलेल्या निर्देशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर च्या वतीने मोटार सायकल मशाल रॅली काढण्यात आली . जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन गुलाबरावजी देवकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालयापासुन सुरुवात करण्यात आली.

तद्नंतर रॅली रिंग रोड मार्गे कोर्ट चौक , नेहरू चौक , रेल्वे स्टेशन , टॉवर चौक , महात्मा गांधी मार्केट , सुभाष चौक , चित्रा चौक , कोर्ट चौक या मार्गाने निघुन महात्मा गांधी उद्यान येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व पुष्पवष्टी करून रॅलीचा समारोप करण्यात आला . रॅली मार्गादरम्यान येणाऱ्या महाराणा प्रताप , बहिणाबाई चौधरी , पंडित जवाहरलाल नेहरू , डॉ. बाबासाहेब आंबेडकर , सुभाषचंद्र बोस , महात्मा फुले , छत्रपती शिवाजी महाराज या सर्व राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना देखील पुष्पहार अर्पण करून त्यांच्यावर देखील पुष्पवृष्टी करण्यात आली . सदर रॅलीत सुमारे 200 हुन अधिक मोटारसायकल असुन कार्यकर्त्यांच्या हातात मशाल व राष्ट्रध्वज होते . कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर भारत माता की जय , वंदे मातरम् व राष्ट्रपुरुषांच्या नावाने घोषणा देत आसमंत दणाणून सोडले.

अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला . सदर रॅलीत महानगर अध्यक्ष अशोकभाऊ लाडवंजारी , प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी , प्रदेश चिटणीस एजाज भाई मलिक , माजी नगरसेवक राजू मोरे , युवक अध्यक्ष रिंकू चौधरी , डॉ. रिजवान खाटीक , मजहर पठाण , रमेश बहारे , इब्राहिम तडवी सर , सुशील शिंदे , किरण राजपूत , रहीम तडवी , संजय जाधव , हितेश जावळे , राहुल टोके , अनिल पवार , किरण चव्हाण , शालिनीताई बनसोडे व महिला आघाडीसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झालेत .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

युनिटी ऑफ नेशन फाऊंडेशनच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

Next Post

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे ‘भारतीय स्वातंत्र्याची गाथा’ खास प्रदर्शन

Next Post

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे 'भारतीय स्वातंत्र्याची गाथा' खास प्रदर्शन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo