Friday, January 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भुसावळहून मजूरांना घेऊन धावली सहरशासाठी श्रमिक एक्स्प्रेस

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
भुसावळहून मजूरांना घेऊन धावली सहरशासाठी श्रमिक एक्स्प्रेस

जळगावसह धुळे, नंदुरबार व बुलढाणा जिल्ह्यात अडकलेल्या 1224 प्रवाशांना मिळाला दिलासा

जळगाव (जिमाका) दि. 16 -कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीय प्रवाशांसाठी राज्य शासनाने स्वखर्चातून रेल्वे सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सुरुवातीला भुसावळातून लखनऊ व गोरखपूरसाठी विशेष गाडी सोडण्यात आल्यानंतर आज शनिवारी सायंकाळी 6.30 वाजता प्लॅटफार्म क्रमांक सातवरून 01857 भुसावळ-सहरशा (बिहार) एक्स्प्रेस रवाना झाली.

या गाडीत जळगाव जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार व बुलढाणा भागात अडकलेल्या एक हजार 224 प्रवाशांना प्रवेश देण्यात आला.

परप्रांतीय प्रवाशांना दिलासा

01857 भुसावळ-सहरशा एक्स्प्रेसने बुलढाणा येथील 212, जळगाव जिल्ह्यातील 747, धुळे जिल्ह्यातील 203 तर नंदुरबार जिल्ह्यातील 62 मिळून एकूण एक हजार 224 प्रवासी रवाना झाले. प्रति पॅसेंजर 650 रुपयांप्रमाणे तिकीटाचा खर्च राज्य शासनाकडून करण्यात आला. रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक सातवर लावण्यात आलेल्या गाडीत सोशल डिस्टन्स राखून प्रवाशांना प्रवेश देण्यात आला. यावेळी या प्रवाशांना जेवण, केळी, पाणी बाॅटल देण्यात आली. व त्यानंतर ही रेल्वे गाडी रवाना करण्यात आली.

यावेळी नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, किरण सावंत, डीवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे आदीसह लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे व त्यांचे पोलिस कर्मचारी रेल्वे चे अधिकारी, कर्मचारी या प्रवाशांना निरोप देण्यासाठी उपस्थित होते.

तत्पूर्वी या सर्व प्रवाशांना दुपारी जळगाव, धुळे, बुलढाणा व नंदूरबार येथून एसटी महामंडळाच्या 55 पेक्षा अधिक बसमधून भुसावळ रेल्वे स्थानकावर आणण्यात आले होते. दीड महिन्यापासून लाॅकडाऊनमध्ये अडकलेले मजूर
भुसावळ रेल्वे स्थानकावर पोहचल्यावर त्यांच्या चेह-यावर आनंद दिसून येत होता. प्रदिर्घ कालावधीनंतर आपल्या गावी जाण्यास मिळत असल्यामुळे व प्रशासनाने केलेल्या सोयीमुळे अनेक प्रवाशांनी प्रवाशांनी जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राज्यात सलग तिसऱ्यांदा दिवसाला ५०० पेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी

Next Post

कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या कार्याध्यक्षपदी युवा उपक्रमशील शेतकरी “मयूर वाघ” यांची निवड

Next Post
कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या कार्याध्यक्षपदी युवा उपक्रमशील शेतकरी “मयूर वाघ” यांची निवड

कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या कार्याध्यक्षपदी युवा उपक्रमशील शेतकरी "मयूर वाघ" यांची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d