Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भुसावळातून लखनऊसाठी धावली ‘श्रमिक’ एक्स्प्रेस टाळ्यांचा कडकडाटात 1306 प्रवाशांना दिला निरोप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
भुसावळातून लखनऊसाठी धावली ‘श्रमिक’ एक्स्प्रेस टाळ्यांचा कडकडाटात 1306 प्रवाशांना दिला निरोप

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 6- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये परप्रांतीय मजुरांसह पर्यटक व अन्य नागरीक जिल्ह्यातील विविध भागात अडकले होते. मात्र राज्य शासनाने दिलासा देत प्रशासनाकडे नाव नोंदणी केलेल्या परप्रांतीय प्रवाशांसाठी भुसावळ येथून बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता 01911 भुसावळ-लखनऊ श्रमिक एक्स्प्रेस सोडल्याने परप्रांतीय प्रवाशांना मोठा सुखद धका बसला.

लाॅकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना आपल्या मुळगावी पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासकीय यंत्रणेला याबाबत सुचना दिल्यात. या प्रवाशांना आपल्या मुळगावी जाताना कुठलीही अडचण येवू नये याकरिता स्वतः जिल्हाधिकारी डाॅ अविनाश ढाकणे व जिल्हा पोलिस अधीक्षक डाॅ पंजाबराव उगले यांनी भुसावळ ला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तर इतर प्रशासकीय अधिकारी यांनी रेल्वे स्थानकावर उपस्थित राहून टाळ्यांचा कडकडाट करीत प्रवाशांना निरोप दिला.

श्रमिक एक्स्प्रेसने 1306 प्रवासी रवाना

भुसावळसह जळगाव-520, धुळे-185, अकोला-88 व बुलढाणा भागातील 513 प्रवाशांनी प्रशासनाकडे नोंदणी केलेल्या लखनऊ परीसरातील तब्बल 1306 प्रवाशांना एस.टी.बसेसद्वारे आज दुपारीच भुसावळ रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन करीत एका बोगीत साधारणतः 54 प्रवाशांना बसवण्यात आले तर एकूण 24 डब्यांची भुसावळ-लखनऊ श्रमिक एक्स्प्रेस बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता भुसावळातून रवाना झाली.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, डीआरएम विवेक कुमार गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, किरण सावंत पाटील,
उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, तहसीलदार दीपक धीवरे, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, स्टेशन संचालक जी.आर.अय्यर यांच्यासह महसूल, रेल्वेच्या विविध भागातील अधिकारी तसेच रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

श्रमिक एक्स्प्रेसने लखनऊसाठी रवाना झालेल्या सर्व 1306 प्रवाशांना प्रशासनातर्फे तसेच भुसावळचे नगरसेवक पिंटू कोठारी यांच्यातर्फे जेवण, पिण्याचे पाणी व बिस्कीट पुरविण्यात आली तसेच पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यात.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वाढत्या रुग्णसंख्येने मुलुंड, भांडूपची धारावीच्या दिशेने वाटचाल

Next Post

ठाणे कोव्हीड 19 योद्धा” स्वयंसेवकांची फौज तैनात ठाणे महापालिका आयुक्तांचा अभिनव उपक्रम

Next Post
ठाणे कोव्हीड 19 योद्धा” स्वयंसेवकांची फौज तैनात ठाणे महापालिका आयुक्तांचा अभिनव उपक्रम

ठाणे कोव्हीड 19 योद्धा" स्वयंसेवकांची फौज तैनात ठाणे महापालिका आयुक्तांचा अभिनव उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo