Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळील कर्नाक पुलाच्‍या लोखंडी तुळईचे ८३ टक्‍के सुटे भाग प्रकल्‍पस्‍थळी दाखल…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/12/2024
in राज्य
Reading Time: 1 min read
मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळील कर्नाक पुलाच्‍या लोखंडी तुळईचे ८३ टक्‍के सुटे भाग प्रकल्‍पस्‍थळी दाखल…

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर यांची प्रकल्‍पस्‍थळास भेट

पुलाची दुसरी तुळई स्‍थापित करण्‍याची कार्यवाही दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी पूर्ण करण्‍याकामी महानगरपालिका प्रयत्‍नशील

मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि’मेलो मार्गाला जोडणा-या १५४ वर्ष जुन्या कर्नाक पुलाची बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पुनर्बांधणी सुरू आहे. या प्रकल्प अंतर्गत ५१६ मेट्रिक टन वजनाची दक्षिण बाजुची लोखंडी तुळई (गर्डर) रेल्वे भागावर स्‍थापित करण्‍याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. आता, दुस-या बाजुच्‍या लोखंडी तुळई (गर्डर) चे ४२८ मेट्रिक टन (८३ टक्‍के) सुटे भाग प्रकल्‍पस्‍थळावर दाखल झाले आहेत. तर, उर्वरित सुटे भाग दिनांक २० डिसेंबर २०२४ पर्यंत प्रकल्‍पस्‍थळी दाखल होणे अपेक्षित आहे. तुळईच्‍या सुटे भागांचे जोडकाम, तुळई स्थापित करण्याची कार्यवाही, पोहोचमार्ग (अॅप्रोच रोड) बांधणी, भार चाचणी (लोड टेस्‍ट) आदी कामकाजाचे सूक्ष्‍म नियोजन करत वेळापत्रक निश्चित करण्‍यात आले आहे. त्‍यानुसार, अपेक्षित कार्यवाही पूर्ण झाल्‍यास दिनांक ५ जून २०२५ पर्यंत कर्नाक पूल वाहतुकीस खुला करण्‍यासाठी महानगरपालिका प्रयत्‍नशील आहे.

दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत पुलाच्या पुनर्बांधणीचे कामकाज वेगाने सुरू आहे.

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर यांनी आज, दिनांक १२ डिसेंबर २०२४ रोजी प्रकल्पस्‍थळास प्रत्‍यक्ष भेट देऊन पूल कामाच्‍या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच, संबंधितांना आवश्‍यक ते निर्देश दिले. प्रमुख अभियंता (पूल) श्री. उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता (पूल) शहर श्री. राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी, कामगार यावेळी उपस्थित होते.

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर म्‍हणाले की, कर्नाक पुलाच्‍या दुस-या बाजूच्‍या लोखंडी तुळई (गर्डर) चे ४२८ मेट्रिक टन (८३ टक्‍के) सुटे भाग प्रकल्‍पस्‍थळावर दाखल झाले आहेत. तर, उर्वरित सुटे भाग दिनांक २० डिसेंबर २०२४ पर्यंत प्रकल्‍पस्‍थळी दाखल होणे अपेक्षित आहे. दिनांक १३ जानेवारी २०२५ पर्यंत तुळईच्‍या सुटे भागांचे जोडकाम करून दिनांक १४ जानेवारी २०२५ रोजी ‘ट्रायल रन’ केले जाईल. दिनांक १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी रेल्‍वे ‘ब्लॉक’ मिळण्‍याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडे विनंती करण्‍यात आली आहे. उपरोक्‍त कालावधीत रेल्वे ‘ब्लॉक’ मिळाल्यानंतर दिनांक १९ जानेवारी २०२५ पर्यंत तुळई स्थापित करण्याची कार्यवाही पूर्ण केली जाईल. त्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मध्य रेल्वेसोबत समन्वय साधण्यात येत आहे.

अधिक माहिती देताना श्री. अभिजीत बांगर म्‍हणाले की, रेल्‍वे मार्गावर तुळई स्‍थापित करण्‍याची कार्यवाही पूर्ण झाल्‍यानंतर पुढील कामकाजाचे सूक्ष्‍म नियोजन करून टप्‍पेनिहाय किती कालावधी लागेल, याची निश्चिती करण्‍यात आली आहे. त्‍यानुसार, पूर्व आणि पश्चिम दिशेच्‍या पोहोचमार्ग (अॅप्रोच रोड) साठी खांब बांधणीचा (पाईल फौंडेशन) पहिला टप्‍पा दिनांक १५ मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करणे, दिनांक १७ एप्रिल २०२५ पर्यंत खांब उभारणी पूर्ण करणे, दिनांक ३ मे २०२५ पर्यंत पोहोच रस्‍त्‍यांचे काँक्रिटीकरण आणि दिनांक १ जून २०२५ रोजी भार चाचणी (लोड टेस्‍ट) करण्‍याचे नियोजन आहे. या नियोजित वेळापत्रकानुसार, अपेक्षित कार्यवाही पूर्ण झाल्‍यास दिनांक ५ जून २०२५ पर्यंत कर्नाक पूल वाहतुकीस खुला करण्‍यासाठी महानगरपालिका प्रयत्‍नशील आहे. मात्र, त्‍यासाठी दिनांक १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी मध्‍य रेल्‍वे प्रशासनाने ‘ब्लॉक’ मंजूर करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. त्‍यादृष्‍टीने मध्य रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्‍यानंतर जसे की, अॅण्‍टी क्रॅश बॅरिअर्स, वीजेचे खांब उभारण्‍याकामी होणारा कालापव्‍यय टाळण्‍यासाठी ही कामे समांतरपणे पूर्ण केली जाणार असल्‍याचे अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर यांनी नमूद केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

घरगुती व लहान स्तरावरील राडारोडा वाहून नेणारी ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवा आता ऑनलाईन, अधिक जलद आणि पर्यावरणपूरक

Next Post

डॉ. गुणवंतराव सारोदे आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गोदावरी नर्सिंग महाविद्यालयास भेट

Next Post
डॉ. गुणवंतराव सारोदे आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गोदावरी नर्सिंग महाविद्यालयास भेट

डॉ. गुणवंतराव सारोदे आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गोदावरी नर्सिंग महाविद्यालयास भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d