Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश;स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
महा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश;स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार


जळगाव (जिमाका) दि. 15 – महा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील मोहाडी येथील रमाई आवास योजनेचे लाभार्थी सुकलाल मधुकर वाघ यांचा ई-गृहप्रवेश पार पडला.


केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांची अंमलबजावणी गतिमान करणे व त्यामध्ये गुणवत्ता आणणेसाठी 20 नोव्हेंबर, 2020 ते 31 मार्च, 2021 या कालावधीत राज्यात महा आवास अभियान ग्रामीण राबविण्यात आले. या अभियानातंर्गत बांधण्यात आलेल्या 3 लाख 22 हजार 929 घरकुलांचा ई-गृहप्रवेश मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात पाच लाभार्थ्यांना घराची चावी देण्यात आली. तर या कार्यक्रमात जिल्ह्यातील मोहाडी येथील रमाई आवास योजनेचे लाभार्थी सुकलाल मधुकर वाघ यांचा ई-गृहप्रवेश पार पडला. यावेळी गटविकास अधिकारी श्री. सोनवणे यांच्या हस्ते फीत कापून श्री. व सौ वाघ यांना घराची चावी व वृक्ष देऊन त्यांना घराचा ताबा देण्यात आला.


या कार्यक्रमास मुंबई येथे राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास व महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार आदि मान्यवर उपस्थित होते. तर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन पाटील, जिल्हा ग्रामीण‍ विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डिगंबर लोखंडे यांच्यासह विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते. तर मुक्ताईनगर येथून खासदार रक्षाताई खडसे तसेच चाळीसगाव येथून खासदार उन्मेष पाटील तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणाहून आमदार, पंचायत समित्यांचे सभापती व लाभार्थी ऑनलाईन उपस्थित होते.


सौ. रत्ना वाघ यांनी शासन व प्रशासनाचे मानले आभार


सुरुवातील आम्ही अनेक वर्षे भाड्याच्या घरात राहत होतो. स्वत:च्या घराचे स्वप्न होते. ते आज शासनामुळे पूर्ण झाले आहे. रमाई आवास योजनेतंर्गत घरकुल मंजूर झाले आणि आज ई-गृहप्रवेश झाल्याचा आनंद आहे. याबद्दल मोहाडी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे अधिकारी यांनी सहकार्य केल्यामुळे सौ. रत्ना वाघ यांनी शासन आणि प्रशासनाचे यावेळी आभार मानले.


या लाभार्थ्यांना देण्यात आली घरकुलाची चावी


येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध घरकुल योजनांचे लाभार्थी श्री. देवचंद सोनू सुर्यवंशी, संतोष पंडित वाघ, शांताराम रामा तायडे, श्रीमती गंगुबाई देवराम सोनवणे, ज्ञानेश्वर दौलत सोनवणे या लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन पाटील, जिल्हा ग्रामीण‍ विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डिगंबर लोखंडे यांच्या हस्ते घराची चावी व वृक्ष देऊन घराचा ताबा दिला.

त्याचबरोबर जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येकी पाच याप्रमाणे एकूण 75 लाभार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते घराची चावी देऊन ताबा देण्यात आला.


जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत 54258 तर राज्य पुरस्कृत (रमाई, शबरी, पारधी) योजनेतंर्गत 17285 लाभार्थ्यांना मंजूरी देण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांपैकी 51239 लाभार्थ्याना तर राज्य पुरस्कृत योजनांच्या मंजूर लाभार्थ्यांपैकी 15860 लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. तर प्रधानमंत्री आवास योजनेतील 33627 तर राज्य पुरस्कृत योजनेतील 10309 घरकुले पूर्ण करण्यात आली आहे. तर प्रधानमंत्री आवास योजनेतील 796 प्रलंबित घरकुलांचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यातील पंचायत समितीच्या आवारात डेमो हाऊस बांधकाम पूर्ण झाले असून घरकुल मार्ट सुरु करण्यात आल्याची माहिती प्रकल्प संचालक श्री. लोखंडे यांनी यावेळी दिली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

दहा हजाराची लाच – प्रकल्प अधिका-यास भोवली

Next Post

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने संपर्क अभियानाची सुरुवात

Next Post
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने संपर्क अभियानाची सुरुवात

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने संपर्क अभियानाची सुरुवात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d