Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महामार्ग पोलिस पाळधी व मौलाना आझाद फाउंडेशन च्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
महामार्ग पोलिस पाळधी व मौलाना आझाद फाउंडेशन च्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

रस्ता सुरक्षेचा दृष्टीने विविध विषयांवर केले मार्गदर्शन

जळगांव(प्रतिनीधी)- रस्त्यावरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो. असच महामार्ग पोलीस पाळधी व मौलाना आझाद फाउंडेशन च्या वतीने रस्ता सुरक्षा जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. राज्यात दरवर्षी सरासरी हजारो लोकांचा अपघातामध्ये मृत्यू होतो. तसेच या अपघातामधे मृत्युमुखी पडणाऱ्या ८० टक्के लोकांचे वय हे साधारणपणे १८ ते ३० वयोगटातील असते. राज्यातील तरुण मनुष्यबळ जर एवढ्या मोठया प्रमाणात अपघातात नष्ट होत असेल तर ती राज्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. त्यामुळे आता रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांना कळावे यासाठी राज्यभर रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. केवळ वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करणे हा या मोहिमेचा उद्देश न ठेवता समाजप्रबोधनातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे हा या मोहिमेचा उद्देश असल्याने महामार्ग पोलिस पाळधी व मौलाना आझाद फाउंडेशन च्या वतीने हा सप्ताह शहरातील ट्रांसपोर्ट नगर एम आय डि सी येथे राबविण्यात आला. यावेळी येथील वाहन चालकांना मार्गदर्शनपर वाहतुक नियमांचे पत्रके वाटून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या रस्ता सुरक्षाविषयक मार्गदर्शन करतांना महामार्ग पोलिस पाळधी चे स.पो.नि. सुनील मेढे मार्गदर्शन करतांना म्हणाले, वाहतुक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकांवर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणीही वाहतुक नियमांचे उल्लंघन करु नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नंतर याप्रसंगी उपस्थित मौलाना आझाद फाउंडेशन चे अध्यक्ष फिरोज शेख यांनी सांगितले की, आपल्या अधिकार व हक्कांबाबत नागरिक जागृत असतात. ते असायलाही हवे. मात्र कर्तव्यांबाबत आपण फारसे गंभीर दिसत नाही. कायद्याचे पालन करणे हे सुद्धा आपले मुलभूत कर्तव्यच आहे. असे ते यावेळी बोलताना म्हणाले. याप्रसंगी स.फौ.ममराज जाधव,डॉ. शरीफ बागवान,गुलाब मनोरे, पो.हे.काँ. प्रदिप रणित, पंकज बडगुजर, पो.ना.पवन देशमुख, नितीन सपकाळे, समीर तडवी, अफजल तडवी, दिपक पाटील,हेमंत महाडिक, आदी पोलीस कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उल्का फाउंडेशन दिनदर्शिकेचे मा. आ. गिरीष महाजन यांच्या हस्ते प्रकाशन

Next Post

नांद्रा बु. गावात पालकमंत्री ना.गुलाबराब पाटील यांनी केले शवपेटीचे लोकार्पण

Next Post
नांद्रा बु. गावात पालकमंत्री ना.गुलाबराब पाटील यांनी केले  शवपेटीचे लोकार्पण

नांद्रा बु. गावात पालकमंत्री ना.गुलाबराब पाटील यांनी केले शवपेटीचे लोकार्पण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo