Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत जामनेर तालुक्यात राष्ट्रीय जंतनाशक सप्ताहाची सुरवात

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
21/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत जामनेर तालुक्यात राष्ट्रीय जंतनाशक  सप्ताहाची सुरवात

जामनेर(शांताराम झाल्टे)- सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व आरोग्य विभाग जि.प.जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने २१ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमशंकर जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यासह तालुक्यात राष्ट्रीय जंतनाशक सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

जंतसंसर्गामुळे(वर्म) वय वर्षे १ ते १९ वर्षे वयोगटातील मुलामुलींमध्ये विविध प्रकारचे दुष्परिणाम दिसुन येतात. जंतामुळे रक्तक्षय होऊन बालकांचा विकास व शारीरिक वाढ यावर मोठया प्रमाणात दुष्परिणाम दिसून येतो त्यामुळेच बालकांचे कुपोषण होऊन त्यांची वाढ खुंटते.जंतांचा संसर्ग अधिक प्रमाणात झाल्यास बालके सतत आजारी पडतात त्यांच्यामध्ये थकवा जाणवणे, पोट दुखणे,एकाग्रता कमी होणे,शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटते.यामुळे वर्षातून दोन वेळा “जंतनाशक मोहीम”आरोग्य विभागाच्या वतीने राबवण्यात येते.

या मोहिमेत वय वर्षे१ ते १९ वर्षे वयोगटातील अंगणवाडी, मराठी शाळा, हायस्कुल,आश्रम शाळा, अनुदानित शाळा,खाजगी शाळा,कॉलेज, या ठिकाणी नोडल शिक्षकांकडून तसेच या वयोगटातील शाळाबाह्य मुलामुलींना अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्या द्वारे जंतनाशक गोळीची मात्रा दिली जात आहे.तसेच जंतनाशक मात्रेबरोबरच त्यांना हात स्वच्छ धुणे,विशेषतः सौच्यानंतर व जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुणे,सौच्यास उघड्यावर न बसता सौच्यालयाचा वापर करणे,बाहेर खेळतांना पायात बूट किंवा चपला घालणे, व्यवस्थीत शिजलेले अन्न खाणे,निर्जंतुक व स्वछ पाण्यात भाज्या व फळे धुणे,नियमित नखे काढणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे.

जंतनाशक गोळीच्या मात्रेचे सेवन केल्यास व वरील नियमांचे पालन केल्यास रक्तक्षय कमी होऊन बालकांचे आरोग्य सुधारते त्यांची झपाट्याने वाढ होऊन प्रतिकार शक्ती वाढते. आरोग्य चांगले राहिल्यामुळे आकलन शक्ती व एकाग्रता वाढते. या मोहिमेत आरोग्य विभागाबरोबरच अंगणवाडी विभाग व शिक्षण विभाग यांची महत्वाची भूमिकाबजावत आहे.जामनेर तालुक्यात एकूण २४५१४२ बालकांना जंतनाशक डोस ची मात्रा देण्यात येणार आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

फोर्स वन हद्दीतील आदिवासी पाड्यांचे म्हाडामार्फत कालबद्धरितीने पुनर्वसन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

Next Post

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘ई- पीक पाहणी’ प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांची उद्या मुलाखत

Next Post
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘ई- पीक पाहणी’ प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांची उद्या मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘ई- पीक पाहणी’ प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांची उद्या मुलाखत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo