Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्राची सुपूत्री देवांशी जोशीला बौध्द‍िक अक्षमता श्रेणीतील ‘रोल मॉडल’ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
01/12/2021
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
महाराष्ट्राची सुपूत्री देवांशी जोशीला बौध्द‍िक अक्षमता श्रेणीतील ‘रोल मॉडल’ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली- मुळची महाराष्ट्राची सध्या दिल्लीत वास्तव्यास असलेली देवांशी जोशी ला बौध्द‍िक अक्षमता श्रेणीतील ‘रोल मॉडेल’ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण 3 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहेत.दरवर्षी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने ‘राष्ट्रीय दिव्यांग सक्षमीकरण पुरस्कार’ प्रदान केले जातात. यावर्षी 3 डिसेंबर 2021 रोजी विज्ञान भवन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.देवांशी ही डाउन सिंड्रोम असलेली स्वावलंबी मुलगी आहे. देवांशीचा जन्म नागपूरचा आहे.

नववीपर्यंतचे तीचे शिक्षण नागपूरातील सामान्य शाळेतच झालेले आहे. ती तीच्या कर्तृत्वाने बौध्दिक अक्षमतांबद्दल असलेला समाजातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करते आहे. आठ वर्षापासून ती पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून कार्य करीत आहे.सध्या ती दिल्लीतील वसंत कुंज येथील ब‍िग बाजारमध्ये फॅशन विभागात पूर्णवेळ कर्मचारी म्हणून आहे. ती न्यूरो-डॉयवर्सिटी श्रेणीतील पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून काम करणारी ती प्रथम आहे. कामादरम्यान कुठल्याही विशेष सवलतीचा लाभ न घेता देवांशी पुर्ण समर्पण आणि उत्साहीपणे काम करते. देवांशी जोशीने नेशनल ओपन स्कूल मधून 10 व 12 वी चे शिक्षण पूर्ण केलेले आहे. तिने विविध कौशल्य प्रशिक्षणही घेतले आहे.

तिच्या बहुआयामी व्यक्तीत्वाची कौतूक दखल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतलेली आहे. यापूर्वी 2016 मध्ये तीला ‘उत्कृष्ट कर्मचारी’ म्हणूनही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.देवांशीला नियमितपणे ऑनलाईन, ऑफलाईन कार्यक्रमात आपल्या अनुभवाविषयी वक्ता म्हणून सांगत असते.

वर्ष 2020 मध्ये संयुक्त राष्ट्र जिनेवा येथे बोलविण्यात आले होते परंतू कोरोना महासाथीमुळे देवांशीला जाता आले नाही. यावर्षी तीने ऑनलाईन माध्यमाने आपले विचार संयुक्त राष्ट्राच्या मंचावर मांडले.देवांशीला फोटोग्राफीचा छंद आहे. ती समाज माध्यमांवरही सक्रीय असते. तिला देश विदेशात प्रवास करायलाही आवडतो. तिच्या या सर्व वाटचालीत तिचे वडील अनिल जोशी आणि आई रश्मी जोशी यांचे मोठे पाठबळ आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सल्लागार म्हणून सीताराम कुंटे यांनी स्वीकारला पदभार

Next Post

राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर

Next Post
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अ आणि ब वर्ग पदासाठीची प्रक्रिया सुरु

राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d