Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्रातील तीन खेळाडूंना क्रीडा पुरस्कार प्रदान

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
13/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
महाराष्ट्रातील तीन खेळाडूंना क्रीडा पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली- राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते वर्ष 2021 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील तीन खेळाडूंचा समावेश आहे. तर गिर्यारोहक प्रियांका मोहिते यांना तेनजिंग नॉर्गे साहस पुरस्कार प्रदान करण्यात आला.केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये वर्ष 2021 चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर, केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रमाणिक तसेच वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करून खेळाडूंना गौरविण्यात आले.दरवर्षी खेळाडूंच्या चमकदार कामगिरीसाठी केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात येतात. यावर्षी 12 खेळाडूंना ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ तर 35 खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाले होते. यासह ‘द्रोणाचार्य’ श्रेणीतील ‘जीवनगौरव पुरस्कार’ आणि नियमित द्रोणाचार्य पुरस्कार’ असे एकूण 10 खेळाडूंना तसेच क्रीडा प्रशिक्षकांना जाहीर करण्यात आले होते. याशिवाय ‘ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार’ देशातील 5 खेळाडूंना जाहीर झाले होते. 2 संस्थांना ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार’ आणि पंजाब विद्यापीठ, चंदीगडला ‘मौलाना अबुल कलाम आझाद ट्राफी’ ची घोषणा करण्यात आली होती.

बुद्धिबळ खेळाडू ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार प्रदान बुद्धिबळ या खेळासाठी ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. श्री कुंटे यांनी अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेतला आहे. भारतीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप (ICC) मध्ये आतापर्यंत दोन सुवर्ण,4 कांस्य पदक पटकाविली आहेत.

2003 ची ब्रिटिश चेस चॅम्पियनशिप त्यांनी जिंकली आहे. राष्ट्रकुल बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये दोन पदके मिळविली होती. वर्ष 2000 मध्ये श्री कुंटे यांना ‘ग्रँडमास्टर’ चा खिताबही बहाल झाला आहे. त्यांच्या बुद्धिबळातील एकूण यशस्वी वाटचालीसाठी त्यांना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार आज सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्रामधून मल्लखांब या क्रीडा प्रकारासाठी हिमानी उत्तम परब यांना आणि अंकिता रैना यांना टेनिसमधील आतापर्यंच्या चमकदार कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला होता. मल्लखांब खेळाडू हिमानी उत्तम परब ह‍िने लहान वयापासूनच मल्लखांब या साहसी खेळ खेळायला सुरवात केली. मल्लखांबवर विविध कसरती करण्यात हिमानी अतिशय कुशल आहे. तिने विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्रासह देशाचे नाव उंचावले आहे.

प्रथम आंतरराष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत कुमारी हिमानीने सुवर्ण पदक पटकाविले आहे. तीच्या या कर्तबगारीसाठी अर्जुन पुरस्काने आज गौरविण्यात आले.टेनिस खेळाडू अंकिता रैना जागतिक टेनिस स्पर्धेत उच्च मानाकंन गाठला आहे. अंकिता लहान वयापासून टेनिस खेळायला सुरूवात केली. विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सहभाग घेऊन पदके आपल्या नावावर केले आहेत. अंकिताचा जन्म गुजरातचा असून वर्ष 2007 पासून रैना हिने पुणे येथे व्यावसायिक टेनिसचे प्रशिक्षण घेतले आहे.

गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते यांना तेनजिंग नॉर्गे साहस पुरस्कार गिर्यारोहण या साहसी क्रीडा प्रकारात नवनवीन विक्रम करणाऱ्या गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते तेनजिंग नॉर्गे साहस पुरस्काराने आज गौरविण्यात आले. अन्नपूर्णा शिखरवर चढणारी प्रथम भारतीय महिला कुमारी मोहिते या आहेत. यासह अन्य शिखरावर ही त्यांनी चढाई केलेली आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

बांभोरी प्र.चा.ग्रामपंचायतने अंगणवाडी व जि. प.शाळेत ‘बाल दिन’ केला साजरा

Next Post

वाघाचा उपद्रव असलेल्या गावांमध्ये शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करा

Next Post
वाघाचा उपद्रव असलेल्या गावांमध्ये शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करा

वाघाचा उपद्रव असलेल्या गावांमध्ये शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo