Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्राला आज ६ पद्म पुरस्कार

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
09/11/2021
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
महाराष्ट्राला आज ६ पद्म पुरस्कार

नवी दिल्ली- देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्‍या पद्म पुरस्कारांचे वितरण आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसिध्द उद्योजक श्री. रजनीकांत देविदास श्रॉफ यांना पद्मभूषण तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे यांच्यासह अन्य तीन मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये पद्म पुरस्कार वितरण सोहळा दोन टप्प्यात आयोजित करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वर्ष 2021 च्या पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. दोन्ही टप्प्यातील पुरस्कार समारंभात उपराष्ट्रपती वैंकय्या नायडु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा अन्य केंद्रीय मंत्री तसेच मान्यवर उपस्थित होते. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात येते.

प्रसिध्द उद्योजक रजनीकांत देविदास श्रॉफ यांना व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी श्री. श्रॉफ यांना पद्मभूषण हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नावाजलेली कृषी कंपनी ‘युनायटेड फॉस्‍फोरस’ चे अध्यक्ष श्री श्रॉफ आहेत. ही कंपनी जगभरातील 130 देशांना उत्पादन निर्यात करते.

महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी नामदेव कांबळे यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री कांबळे यांच्या आतापर्यंत 15 कादंबऱ्‍या आणि काही कथासंग्रही प्रकाशित झालेली आहेत. लिखाणातून सामाजिक एक्याचा संदेश त्यांनी दिलेला आहे. त्यांच्या ‘राघववेळ’ या कांदबरीसाठी श्री कांबळे यांना 1995 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कारही मिळालेला आहे.कला क्षेत्रातील योगदानासाठी श्री परशुराम आत्माराम गंगावणे यांना पद्मश्री प्रदान करण्यात आलेला आहे.

श्री परशुराम हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजातील आहेत. जवळपास 500 वर्ष जूनी असलेली चित्रकथी ही लोककला जोपासण्याचे कार्य ते करीत आहेत. चित्रकथीच्या माध्यामातूने समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन करतात त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. चित्रकथीचे दस्तऐवजीकरण व संशोधन करण्याच्या हेतूने परशुराम गंगावणे यांनी ‘ठाकर आदिवासी कला आंगण’ या ठाकर कलाच्या संग्रहालयाची स्थापना केलेली आहे.

व्यापार व उद्योगाक्षेत्रातील योगदानासाठी ‘श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड’ च्या सहसंस्थापिका श्रीमती जसवंतीबेन जमनादास पोपट यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. 1959 मध्ये सात गृहिणींनी आणि 80 रूपयांच्या भांडवलावर गृहउद्योग सुरू केला होता. आज या गृहउद्योगाचा वटवृक्ष निर्माण झालेला आहे.

सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेली चार दशके त्या अनाथांच्या आई म्हणून काम करीत आहेत. म्हणुन त्यांना प्रेमाने त्यांची सारी लेकरे ‘माई’ म्हणतात. श्रीमती सपकाळ यांना डॉक्टरेट ची उपाधी म‍िळालेली आहे.

भटक्या विमुक्त समाजातील लोकांना आत्मभान देण्याचे कार्य श्री ग‍िरीश प्रभुणे मागील कित्येक वर्षांपासून करीत आहेत. यासह गुरूकुल परंपरेच्यामाध्यमातून या समाजातील पारंपारिक कला जोपसण्याचे कार्यही श्री प्रभुणे करीत आहेत. या त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावर्षी एकूण 119 पद्मपुरस्कार जाहीर झाले होते. आज सकाळच्या आणि सायंकाळाच्या दोन टप्प्यांमध्ये एकूण 119 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये 7 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि एकूण 102 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये 29 महिलांचा समावेश आहे. 10 अप्रवासी भारतीय तसेच अन्य देशातील गणमान्य आहेत. यासह 16 मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार तर एका तृतीय पंथी व्यक्तीस हा मानाचा पुरस्कार आज प्रदान करण्यात आलेला आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राज्यात दहा कोटी लसीकरण सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

Next Post

हिराबाई निळकंठराव देसाई यांचे वृद्धापकाळाने निधन

Next Post

हिराबाई निळकंठराव देसाई यांचे वृद्धापकाळाने निधन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d