Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महावितरणच्या बोदवड उपविभाग कार्यालय नुतनीकरण इमारतीचे उद्घाटन संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव –  महावितरणच्या बोदवड उपविभागीय कार्यालयासाठीच्या नुतनीकरण केलेल्या वसाहत इमारतीचे उद्घाटन जळगाव परिमंडळाचे उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री.अरूण शेलकर यांचे हस्ते नुकतेच संपन्न झाले.

याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे, उप विभागीय अभियंता दिपक राठोड, कनिष्ठ अभियंता संदिप पवार,अतिश कुलकर्णी, प्रफुल्ल कोकाटे,  कनिष्ठ लिपिक सचिन पाटील, पराग बडगुजर आदींची  उपस्थिती होती. याप्रसंगी पुढे बोलताना श्री.शेलकर म्हणाले की, बोदवड शहरातील प्रशासकीय कार्यालयांच्या परिसरातच व स्वमालकीच्या इमारतीत महावितरण कार्यालयांचे स्थलांतर झाल्याने नागरिकांची व वीज ग्राहकांची सोय झाली आहे.  बोदवड उपविभागीय कार्यालयासह बोदवड ग्रामिण कक्ष 1, बोदवड ग्रामिण कक्ष 2, कोल्हाडी कक्ष, एनगाव कक्ष कार्यालयाचे स्थलांतर या एकाच इमारतीत करण्यात आल्याने कामासाठी येणाऱ्या ग्राहकांचा वेळ वाचेल. सर्व कार्यालये एकाच छताखाली आल्याने समन्वय वाढीस लागुन कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामकाजातही गती येईल. इमारत भाड्यापोटी खर्च होणाऱ्या वार्षिक महसुलातही बचत होईल.

बोदवड उपविभाग व चार कक्ष कार्यालये बोदवडच्या भुसावळ रोडवरील विद्युत भवन, वसाहती गाळा क्रमांक 4 येथे स्थलांतरीत झाली आहेत, याची वीजग्राहकांनी नोंद घ्यावी असे आवाहन मुक्ताईनगर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. महेश पाटील यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हा परिषदेच्या अपात्र कर्मचारी बडतर्फीचे ग्रहण कधी सुटणार?

Next Post

जळगावातील उच्चशिक्षित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

जळगावातील उच्चशिक्षित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo