Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महिलांनो, सन्मान मिळवायला शिका;हेमाताई अमळकर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

महिला सफाई कर्मचार्‍यांचा महापौरांकडून साडीचोळी देवून सन्मान

जळगाव, दि.8 – आजच्या काळात कुणीतरी आपल्याला सन्मान देईल याची वाट न बघता तो सन्मान कसा मिळवया येईल याचा विचार महिलांनी करायला हवा. आपल्यावर होणारा अन्याय आपण सहन करणार नाही तरच सन्मान मिळेल, त्यामुळे महिलांनो सन्मान मिळवायला शिका आणि आवश्यक असेल त्याची मदत घ्या असे आवाहन, समाजसेविका हेमाताई अमळकर यांनी केले.
वर्षभर शहरातील कचरा साफ करून जळगावकरांसाठी सेवा बजावणार्‍या उत्कृष्ट महिला सफाई कर्मचारी कायम दुर्लक्षित असतात. यंदाचा महिलादिन मात्र त्यांच्यासाठी आनंददायी ठरला आहे. मनपाची स्थापना झाल्यापासून आजवर कुणीही महिला सफाई कर्मचार्‍यांचा सन्मान केलेला नव्हता. समाजाती सर्वात शेवटच्या घटकाचा सन्मान करण्याचा नवीन पायंडा महापौर भारती सोनवणे यांनी रचला. महिला दिनाचे औचित्य साधत महापौर भारती सोनवणे यांनी सफाई कर्मचारी महिलांचा साडीचोळी देऊन गौरव केला. मनपा इमारतीमधील दुसर्‍या माळ्यावर असलेल्या सभागृहात सायंकाळी 5 वाजता महापौर भारती सोनवणे यांनी महिला दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अध्यक्षस्थानी समाजसेविका हेमाताई अमळकर, स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा, महिला व बाल कल्याण सभापती शोभाताई बारी, शिवसेना गटनेते अनंत जोशी, नगरसेवक कैलास सोनवणे, उपायुक्त मिनीनाथ दंडवते, नगरसेवक सदाशिव ढेकळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष मराठे यांनी केले. महिला दिनानिमित्त 10 आरोग्य युनिटमधील 40 उत्कृष्ट महिला स्वच्छता कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात आला.

स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांनी सांगितले की, महिला मुळातच प्रामाणिक असतात आणि त्यांना जबाबदारीची जाणीव असते. शहराची स्वच्छता करताना स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी. स्वच्छता करताना वापरण्यास मनपाने दिलेल्या वस्तूंचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.
शिवसेना गटनेते अनंत जोशी म्हणाले की, महापौर पद कैलास सोनवणे यांच्या कुटूंबात आले तेव्हा आम्हाला प्रचंड आनंद झाला. कैलास सोनवणेंकडे जेव्हा जेव्हा चांगले पद आले तेव्हा त्यांनी काहीतरी नाविन्यपूर्ण काम केले आणि यापुढे देखील ते घडत राहिल. महिलांनी शहराची स्वच्छता करताना स्वतःची देखील काळजी घ्यावी असेही ते म्हणाले.
उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी, महिलाभगिनी प्रामाणिकपणे काम करीत असल्याचे आजवर निर्देशनास आले असल्याचे नमूद केले. महिलांचा सन्मान घरातूनच व्हायला हवा. महिला सोशिक आणि बचती असतात. बचत ही काळाची गरज असून ती आपल्याला महिलांकडून शिकायला मिळते असे सांगत महिलांनी बँकेत खाते उघडून बचत करायला हवी असे आवाहन त्यांनी केले.

सफाई कर्मचारी नव्हे मेडीकल इंजिनिअर

जळगाव शहराची दररोज स्वच्छता करणार्‍या सर्व महिला सफाई कर्मचारी नव्हे तर शहराच्या मेडीकल इंजिनिअर आहेत. प्रत्येक रोगराई त्या सर्वप्रथम स्वतःच्या अंगावर घेतात आणि शहर स्वच्छ ठेवतात असे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सांगितले. तसेच कोरोना व्हायरस शहराच्या वेशीपर्यंत येवून पोहचला असून तत्पूर्वी आरोग्याचे टेंडर प्रशासनाने लवकरात लवकर उघडावे असे आवाहन देखील कैलास सोनवणे यांनी केले. शहरातील स्वच्छतेसाठी महापौरांनी मास्टर प्लॅन तयार केला असून तो अंमलात आणल्यानंतर राज्यात नवा पॅटर्न तयार होईल असेही सोनवणे यांनी सांगितले.

महापौरांकडून शुभेच्छा आणि आवाहन

जागतिक महिला दिनानिमित्त महापौर भारती सोनवणे यांनी सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. तसेच दोन दिवसांवर येवून ठेपलेला रंगपंचमीचा उत्सव यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने टाळण्याचे आवाहन त्यांनी केले आणि गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचेही त्यांनी सांगितले. दोन दिवसापूर्वी महापौर भारती सोनवणे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत साहस फाऊंडेशनच्या सरीता माळी, नेहरू चौक मित्र मंडळाचे अजय गांधी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रंगपंचमी उत्सव टाळण्याचे मान्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

8 मार्च जागतिक महिला दिन-अरुण वांद्रे(शिक्षक)

Next Post

नवकार युवा प्रतिष्ठानच्या ढोल पथकाच्या सरावाला सुरुवात

Next Post
नवकार युवा प्रतिष्ठानच्या ढोल पथकाच्या सरावाला सुरुवात

नवकार युवा प्रतिष्ठानच्या ढोल पथकाच्या सरावाला सुरुवात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d