Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मांस विक्रेत्यांना नोटीस पाठवा, स्वच्छतेसाठी जनजागृती करण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांच्या सूचना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

मनपा आरोग्य अधिकार्‍यांची घेतली बैठक

जळगाव-(प्रतिनिधी) – कोरोना व्हायरसमुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसले तरी सर्वांनी योग्य ती सावधनता बाळगणे आवश्यक आहे. कोरोना व्हायरस मांस, मासे, कोंबड्यांमुळे फैलत असल्याने जळगाव शहरातील सर्व मांस विक्रेत्यांना स्वच्छतेसंदर्भात नोटीस पाठवावी तसेच शहरभर जनजागृती करण्यासाठी शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना स्वच्छतेची महत्व पटवून द्यावे, अशा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी केल्या.
गुरूवारी दुपारी 2 वाजता मनपातील महापौर दालनात शहरातील मनपाच्या रूग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती तेव्हा त्या बोलत होत्या. यावेळी बैठकीला नगरसेवक कैलास सोनवणे, मनपा आरोग्य समितीचे सदस्य डॉ.विरेन खडके, डॉ.चंद्रशेखर पाटील, महेश चौधरी यांच्यासह उपायुक्त मिनानाथ दंडवते, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी, शहर लसीकरण अधिकारी डॉ.मनिषा उगले, डॉ.शिरीष ठुसे, डॉ.नेहा भारंबे, डॉ.विजय घोलप, डॉ.संजय पाटील, डॉ.युधिष्ठीर इंगळे, डॉ.पल्लवी पाटील, डॉ.पल्लवी नारखेडे, डॉ.सोनल कुलकर्णी, डॉ.सायली पवार, डॉ.हेमलता नेवे आदी उपस्थित होते.

मनपा रूग्णालयामार्फत योग्य ती खबरदारी घ्या

मनपाच्या रूग्णालयामार्फत कोरोना व्हायरस रोखण्यासाठी योग्य ती खबरादारी घ्यावी. कोरोना व्हायरसचे स्त्रोत, प्रसार माध्यम, लक्षणे, निदान, प्रतिबंध, उपचार, गैरसमज याबाबत नागरिकांना माहिती द्या. जनजागृतीसाठी पारिचारिका व आशा सेविकांची मदत घ्या. संशयीत रूग्ण आढळून आल्यास तात्काळ त्याचे नमुने घेवून पुण्याला तपासणीसाठी पाठवा अशा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या.

शाळा, महाविद्यालयात जनजागृती करा

जळगाव शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीमार्फत पत्रक काढून सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेची महत्व पटवून द्यावे. आवश्यकता भासल्यास डॉक्टरांकडून त्याठिकाणी माहिती देण्यास सांगावे असेही महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले.

कत्तलखाने बंद ठेवावे

शहरात असलेल्या सर्व मांस विक्रेत्यांना स्वच्छतेसंदर्भात नोटीस पाठविण्यात यावी तसेच उघड्यावर मांस विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या. इस्लामपुरा सारख्या दाट वस्तीच्या परिसरातील कत्तलखाने काही दिवसांसाठी बंद ठेवावे असे महापौरांनी सांगितले.

रंगपंचमीचा उत्सव टाळण्याचे आवाहन

गर्दीच्या ठिकाणी एखादा कोरोना संसर्गग्रस्त व्यक्ती गेल्यास त्याचा फैलाव होण्याची शक्यता मोठ्याप्रमाणावर असते. पुढील आठवड्यात होणार्‍या रंगपंचमी उत्सवाचे शहरात खान्देश सेंट्रल, नेहरू चौक, काव्यरत्नावली चौकासह अनेक ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे. परंतु शहरवासियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने यंदाचा रंगपंचमी उत्सव टाळण्याचे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कासोद्यातील अंगणवाडी सेविका पुन्हा सेवेत

Next Post

हृदयरोग पिडीत अलिझाची रीपरिवर्तन फाऊंडेशन यांनी घेतली जबाबदारी

Next Post
हृदयरोग पिडीत अलिझाची रीपरिवर्तन फाऊंडेशन यांनी घेतली जबाबदारी

हृदयरोग पिडीत अलिझाची रीपरिवर्तन फाऊंडेशन यांनी घेतली जबाबदारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d