Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माझ्यासोबत लग्न कर म्हणत तृतीयपंथीयाने प्रपोज केलं, नकार मिळताच तरुणासोबत केलं भयंकर

Desk Team by Desk Team
01/04/2023
in विशेष
Reading Time: 1 min read


Hingoli Crime News: हिंगोली शहरात एक भयानक घटना घडली आहे. लग्नाला नकार दिल्याने एका युवकाचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.
हिंगोलीः हिंगोली शहरातील खुशाल नगर भागामध्ये राहणाऱ्या एका ऑटो चालकाला तृतीयपंथीने लग्नाची मागणी घातली. मात्र, चालकाने त्यास नकार दिला. याचा राग मनात ठेवून तरुणाचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.याबाबत मिळालेली माहिती अशी की, हिंगोली तालुक्यातील नवलगव्हाण येथील अशोक गजानन आठवले हे मागील काही वर्षांपूर्वी खुशाल नगर भागात राहण्याकरता आले होते. ते मागील काही वर्षापासून ऑटो चालवत असताना या भागात राहणाऱ्या प्रिया नरसिंग तुरमळू या तृतीयपंथीसोबत ओळख झाली होती. ओळखीमुळे अशोक हा त्यांच्याकडेच राहत होता. ३० मार्च रोजी अशोककडे माझ्यासोबत लग्न कर असे म्हणत हट्ट धरला असता त्याने लग्नाकरता नकार दिल्याने प्रिया उर्फ दीपक याने शेख जावेद यांच्यासोबत संगनमत करून अशोकचा गळा आवळून खून केला.त्यानंतर अशोकने गळफास घेतल्याचा बनाव करून त्याला उपचाराकरीता हिंगोलीला शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्याचा खून झाल्याचे जाहीर केले. सदर प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी नातेवाईकांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता.सदर प्रकरणात देविदास आठवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रिया उर्फ दीपक तुरुमळू राहणार उमरी जिल्हा नांदेड हल्ली मुक्काम खुशाल नगर हिंगोली, शेख जावेद शेख ताहेर कुरेशी राहणार हरण चौक हिंगोली या दोघांवर हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिरी हे करीत आहेत. पुण्यातील प्रिया तुरमळू यास पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
धनुष्यबाण गेलं पण ब्रम्हास्त्र माझ्यासोबत; रामटेकमधील शिवसैनिकांसमोर उद्धव ठाकरेंचा एल्गार.

Desk Team

Previous Post

सनातन्यांनी पुन्हा एकदा छत्रपतींच्याच घराण्याला शूद्र म्हणून हिणवण्याचे काम केले आहे. -जितेंद्र आव्हाड

Next Post

बापटांच्या निधनानंतर चार दिवसात भाजप नेत्याचे ‘भावी खासदार’ पोस्टर, जितेंद्र आव्हाड म्हणतात सूतक तरी संपू द्या

Next Post

बापटांच्या निधनानंतर चार दिवसात भाजप नेत्याचे 'भावी खासदार' पोस्टर, जितेंद्र आव्हाड म्हणतात सूतक तरी संपू द्या

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo