Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माधवबाग जळगांव व पु.ना. गाडगीळ अँन्ड सन्स यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या “हार्दीक विजयोत्सवाचे” आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- भारतात सध्या दर तेहतीस सेकंदाला एक व्यक्ती मृत्युमुखी पडत आहे. खाण्यापिण्याच्या बदललेल्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव असलेला बैठा दिनक्रम, वाढलेला मानसिक तणाव आणि व्यसने या सर्व चुकीच्या जीवनशैलीमुळे ही परिस्थिती ओढवली आहे. केवळ हृदयरोगच नव्हे तर त्यास कारणीभूत ठरणारे मधुमेह, अतिरक्तदाब, लठ्ठपणा हे आजारही साथीच्या रोगाप्रमाणे घराघरांमध्ये पसरलेले आपल्याला दिसून येतात. शस्त्रक्रिया व औषधोपचार यावर भारतीयांचे कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. हे सर्व टाळणे नक्की शक्य आहे हे माधवबागच्या हजारो रुग्णांनी सिद्ध करून दाखवले आहे. अत्याधुनिक वैद्यकीय तपासण्या आयुर्वेदाचे ज्ञान आणि जीवनशैलीतील बदल यांची सांगड घालून बनवलेल्या या उपयुक्त पर्यायाची माहिती समाजातील जास्तीत जास्त लोकांना पुरवण्याची आवश्यकता आहे. याचसाठी माधवबाग विविधप्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करत असते. अश्याच एका “हार्दिक विजयोत्सव” या उपक्रमाचे आयोजन येथील माधवबाग व पु.ना. गाडगीळ अँड सन्स यांच्या संयुक्त विद्यमाने  करण्यात आले आहे. यामध्ये माधवबागच्या उपचार पद्धतीने व्याधीमुक्त झालेल्या व निरोगी स्वस्थ आयुष्य जगणाऱ्या रुग्णांचा हार्दिक विजयोत्सव हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यावेळी, माधवबाग मुंबईचे सी.एम.ओ. डॉ. गुरुदत्त अमीन हे उपस्थित राहणार असून जमलेल्या सर्व रुग्णांना ते मार्गदर्शन करणार आहे. यावेळी माधवबागच्या उपचार पद्धतीने व्याधीमुक्त झालेल्या रुग्णांचा सन्मान देखील यावेळी करण्यात येणार आहे. या हार्दिक विजयोत्सवाचे आयोजन उद्या शुक्रवार रोजी शहरातील पु.ना.गाडगीळ अँड सन्सच्या सभागृहात सकाळी १० वाजता करण्यात आले असून, याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन जळगांव माधवबागच्या संचालिका डॉ. श्रद्धा माळी, डॉ. श्रेयश महाजन, अमित माळी(९९२३५२७९८०), जी.टी. महाजन(९४२२५६४७९८) यांच्यावतीने करण्यात आले आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जागतिक महिला दिनानिमीत्त डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे महिलांसाठी आरोग्याचा कृतज्ञता सोहळा

Next Post

कासोदा येथील पंचप्रानेश्वर अभ्यासिकेतील चार विद्यार्थी एकाच वेळी आर्मी मध्ये भरती

Next Post

कासोदा येथील पंचप्रानेश्वर अभ्यासिकेतील चार विद्यार्थी एकाच वेळी आर्मी मध्ये भरती

Comments 1

  1. Anita yuvraj patil says:
    6 years ago

    Great job

    Loading...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d