Friday, August 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माध्यम प्रतिनिधींना 25 लाखाचे विमा संरक्षण मिळण्यासाठी पाठपुरावा करणार-पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री                                   ना.गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 19 :- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेचा भाग म्हणून देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती होण्यासाठी पत्रकारही आपली भूमिका चोखपणे बजावत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्यांनाही २५ लाख रूपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळावे. यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथाजळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

सध्या लॉकडाऊनमुळे बहुतांश उद्योग, व्यापार आणि सेवा बंद आहेत. तथापि, या अत्यंत विपरीत परिस्थितीतही माध्यमांचे प्रतिनिधी आपला जीव धोक्यात घालून आपले काम अतिशय चोखपणे करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, पत्रकारांनाही 25 लाख रूपयांच्या विम्याचे संरक्षण मिळावे याकरिता आपण मुख्यमंत्री यांचेकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही मंत्री श्री. पाटील यांनी दिली. ते आज येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या खात्याच्या अर्थात, मजिप्राच्या पाणीपुरवठा करणार्‍या राज्यभरातील कर्मचार्‍यांसाठी २५ लाखांच्या विम्याचे सुरक्षा कवच यापूर्वीच उपलब्ध करून दिले आहे. याच पध्दतीने पत्रकारांनाही विमा संरक्षण उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना बाधित ५०७ रुग्ण बरे होऊन घरी राज्यातील एकूण रुग्ण संख्या ४२०० राज्यात ५५२ नवीन रुग्णांचे निदान -आरोग्यमंत्री राजेश टोपे

Next Post

जिल्हा प्रशासन, पोलिसांनी आता अधिक सतर्क राहून लॉकडाऊन नियमांचे काटेकोर पालन करावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

जिल्हा प्रशासन, पोलिसांनी आता अधिक सतर्क राहून लॉकडाऊन नियमांचे काटेकोर पालन करावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo