Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुर्तिजापूर येथील कापूस खरेदी केंद्र कार्यान्वित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
मुर्तिजापूर येथील कापूस खरेदी केंद्र कार्यान्वित

स्वतः पालकमंत्रीच शेतकऱ्याला निरोप देतात तेव्हा…

अकोला : ‘हॅलो, मी बच्चू कडू बोलतोय, भाऊराव फाटे बोलतात का? आपण कापूस खरेदीसाठी नोंदणी केली आहे. तर आपण आता उद्या या सकाळी नऊ वाजता, ओम जिनिंग फॅक्टरीला…’ दस्तूरखुद्द पालकमंत्री बच्चू कडू यांनीच शेतकऱ्यांना फोन करुन कापूस खरेदीसाठी येण्याचा निरोप दिला आणि सीसीआय मार्फत मुर्तिजापूर येथे सुरु झालेल्या कापूस खरेदी केंद्रावरील कापूस खरेदीची प्रक्रिया कार्यान्वित झाली.

Maha Info Corona Website

येथील मुर्तिजापूर तालुक्यासाठी सीसीआय चे कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असून तेथील ओम जिनिंग फॅक्टरी येथे कापूस खरेदी प्रक्रियेसाठी तयारी सज्ज करण्यात आली आहे. प्रशासनाने केलेल्या या खरेदी तयारीची पाहणीही पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ  बच्चू कडू यांनी मुर्तिजापूर  येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कापूस खरेदी केंद्रास भेट देऊन केली.

यावेळी सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे, उपविभागीय अधिकारी मुर्तिजापूर अभयसिंह मोहिते,  तालुका खरेदी विक्री संघाचे सचिव  रितेश मडगे, सहायक जितेंद्र कांबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी माहिती देण्यात आली की, मुर्तिजापूर येथील कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी ८५८ शेतकऱ्यांनी कालपासून (दि.११) नोंदणी केली आहे. या ठिकाणी ओम जिनिंग फॅक्टरी येथे कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांना आधी फोन वरुन नोंदणी करता येणार आहे. त्यानुसारच शेतकऱ्यांना फोन करुन आपला कापूस खरेदी केंद्रावर आणण्याबाबत सूचना दिली जाणार आहे. यावेळी स्वतः पालकमंत्र्यांनीच ही सूचना शेतकऱ्यांना देऊन खरेदी प्रक्रियेचा निरोप दिला.

त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मुर्तिजापूर आवारातील नाफेडच्या तुर व हरभरा खरेदी केंद्रास पालकमंत्री कडू यांनी भेट दिली.  यावेळी  व्यवस्थापक धिरज मुळे यांनी आतापर्यंत शासनाकडून ९८८ शेतकऱ्यांची  १४ हजार ५०० क्विंटल  तुर  व  ३०५ शेतकऱ्यांचा सहा हजार ५०० क्विंटल  हरभरा खरेदी करण्यात आला  असल्याची माहिती दिली. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा  त्रास शेतमाल विक्रीस आणताना होऊ नये, असे निर्देश पालकमंत्री  बच्चू कडू यांनी दिले.

तत्पूर्वी पालकमंत्री यांनी ओम जिनिंग फॅक्टरीला भेट देऊन कापूस खरेदीसाठी करण्यात आलेल्या तयारीची पाहणी केली  व योग्य सूचना संबंधितांना दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कोरोनाचे आज १०२६ नवीन रुग्ण; राज्यात एकूण २४ हजार ४२७ रुग्ण

Next Post

आरोग्य विषयक सूचनेसाठी १९२१ टोल फ्री क्रमांक

Next Post
आरोग्य विषयक सूचनेसाठी १९२१ टोल फ्री क्रमांक

आरोग्य विषयक सूचनेसाठी १९२१ टोल फ्री क्रमांक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d