Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मूकनायक पत्रकारिता २०२० साठीचे “जीवन गौरव पुरस्कार” व मूकनायक उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार “करिता प्रस्ताव पाठविण्याचे अवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
मूकनायक पत्रकारिता २०२० साठीचे “जीवन गौरव पुरस्कार” व मूकनायक उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार “करिता प्रस्ताव पाठविण्याचे अवाहन

मूकनायक शताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संघटनेचा उपक्रम

जळगाव-(विशेष) – भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या “मूकनायक”वृत्तपत्राला शंभर वर्ष पूर्ण होत असून या शताब्दी वर्षानिमित्त शताब्दी वर्ष साजरे करण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, यांनी जाहीर केला आहे.त्यानुसार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई या संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यभर “मूकनायक शताब्दी वर्ष” साजरे करण्यत येत आहे.म्हणूनच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, जळगाव जिल्हा शाखा व नजर फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारिता क्षेत्रातील सेवा व्रत असणाऱ्या व संपूर्ण जीवन पत्रकारितेसाठी समर्पित करणाऱ्या पत्रकार,संपादक यांना “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मूकनायक जीवन गौरव पुरस्कार” देण्यात येणार आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील पत्रकारितेत योगदानाबद्दल “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पुरस्कार” दिला जाणार आहे.

तरी या पुरस्कारकरिता जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांनी निवड समिती कडे प्रस्ताव पाठवावे.प्रस्ताव पाठवतांना त्यात पत्रकारितेला सुरवात केल्या पासून ते आज पर्यंतचे संपूर्ण अनुभवाचे सविस्तर नोंदी नमूद करावे, प्रत्येक वर्षाचे विविध वृत्त पत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कमीत कमी पाच कात्रणाचे झेरॉक्स सोबत जोडावे.जिल्ह्यातील पत्रकार बांधवाना उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रस्ताव दिनांक 15 मार्च 2020 पर्यंत पाठविण्याचे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत आहे.

पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय काम करणारे वार्ता संकलन, वार्ता लेखन, बातम्यांचे संपादन, विश्लेषण, बातम्यांवर टिकाटिपण्णी, शासनाचे धोरण, शासकीय योजना सामान्य जनते पर्यन्त पोहचविणे, जन सामान्यांवर झालेल्या अन्यायाला लेखणीच्या माध्यमातून वाचा फोडून न्याय मिळवून देणे असे कामगिरी बजावून उत्कृष्ठ पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांची “मूकनायक पुरस्कार” करिता निवड करतांना या गोष्टी लक्षात घेतल्या जाणार आहेत.त्या नुसार पत्रकार यांनी प्रस्ताव तसा बनवून पाठवावा. पुरस्कार निवड करिता या पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची निवड समिती असणार असून समितीने केलेली निवड अंतिम राहील.असे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

सदर प्रस्ताव – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, ए-विंग, ए-1 पाचवा माळा, गोलाणी मार्केट, जळगाव ता.जि.जळगाव या पत्यावर पाठवावे.संपर्क – 9021969100

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

ब्राह्मण महासंघातर्फे आयोजित महिला रोजगार मेळावा उत्‍साहात संपन्‍न

Next Post

प.वी. पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लुटला थ्रीडी चित्रपटाचा आनंद

Next Post

प.वी. पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लुटला थ्रीडी चित्रपटाचा आनंद

Comments 1

  1. shailesh chaudhari says:
    6 years ago

    ????

    Loading...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d