Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मोठ्याने घराबाहेर काढले…लहान्याने जिवंतपणीच स्मशान दाखवल…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/08/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

भारतात पुर्वीपासुन संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात होती भारतात कालांतराने संयुक्त कुटुंब पद्धती लोप पावत गेली आणि समाजात वृद्धांच्या समस्या डोक वर काढु लागली… कालांतराने तर तरुण पिढी आणि या वृद्धांमध्ये एवढा दुरावा निर्माण झाला आहे की वृद्धांना त्यांचा निवाऱ्याची प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. अशिच एक घटना वर्धा जिल्ह्यात घडली आहे.

ज्या आई-वडिलांनी आपल्या मुलांना खांद्यावर बसवून अख्ख जग दाखवलं त्याच मुलांना आज आपले आई-वडिल जड वाटू लागले आहेत. वर्ध्यामध्ये चक्क पोटच्या गोळ्याने आपल्या वृद्ध आईवडिलांना जिवंतपणी स्मशानभूमीत नेऊन सोडले आहे.

वृद्ध वडिलांना पॅरिलीसिसमुळे नीट चालताही येत नाही तर आईला नीट बोलता येत नाही अशा अवस्थेत मुलाने स्मशानभूमीतील मृतदेह जाळण्याच्या शेडमध्ये नेऊन ठेवले. या धक्कादायक घटनेने संताप व्यक्त करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?

महादेव अलाट (वय 85) त्यांच्या पत्नी मंजुळा अलाट (वय 68) वृद्ध दाम्पत्य मुळचं वर्धा जिल्ह्यातलं आहे. महादेव अलाट हे रेल्वे खात्यातील निवृत्त कर्मचारी आहेत.
अनिल आणि सुनील ही त्यांची दोन मुले आहेत. पण पंख फुटल्यावर जसं पाखरं उडून जातं,तशी यांची दोन पोरंही यांच्यापासून दूर गेली. थोरल्या पोरानं आई-वडिलांना घरातून बाहेर काढलं तर धाकट्यानं स्मशानात सोडून पळ काढला. हा धक्कादायक प्रकार राष्ट्रीय महिला परिषदेच्या कार्यकर्त्याच्या निदर्शनास आला.

राष्ट्रीय महिला परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विचारपूस केली तेव्हा वृद्ध दाम्पत्याने सांगितलेलं वास्तव सांगितले. त्यांच्या मोठ्या मुलाने त्यांना घराच्या बाहेर काढून दिलं व लहान मुलगा त्यांना ओढत स्मशानभूमीत घेऊन आला असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी या वृद्ध दाम्पत्याच्या हक्कांसाठी थेट पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांना मुलाला समज दिली.

पोलिस परत त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेले. तेव्हा घराला कुलूप होतं. कुलूप तोडून घरात गेले तेव्हा कार्यकर्ते आणि पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली. मोठ्या मुलाने आपल्या वृद्ध आई-वडिलांचे कपडेसुद्धा जाळून टाकले होते. हिंदू धर्मानुसार आई-वडिलांचं निधन झाल्यावर त्यांचे कपडे जाळले जातात. मात्र इथं परिस्थिती वेगळीच होती. आईवडिल जिवंत असताना मुलांनी हे कृत्य केलं आहे. वृद्ध वडिल हे रेल्वे विभागात एका टँकरवर ड्रायव्हर होते अशी माहिती आहे. निवृत्तीनंतर त्यांना पेन्शनही मिळत आहे. अशा परिस्थितीसुद्धा मुलांनी त्यांचा मानसिक व आर्थिक छळ करून त्यांना घराबाहेर काढून दिलं. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय महिला परिषद आणि पोलिसांच्या मध्यस्तीमुळे पुन्हा एकदा यांना त्यांच्या हक्काचं घर मिळालंय.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अंधश्रद्धेचा कहर…पत्नीला सर्वांसमोर अंघोळ करायला लावली…कारण एकुण तुम्हालाही बसेल धक्का….

Next Post

बोदवड तालुका निर्मिती ही खूप मोठी उपलब्धी – संदीपभैय्या पाटील

Next Post

बोदवड तालुका निर्मिती ही खूप मोठी उपलब्धी - संदीपभैय्या पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo