Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

युनायटेड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट फाऊंडेशन च्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
30/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
युनायटेड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट फाऊंडेशन च्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार

आमदार गणपत गायकवाड, उपमहापौर भगवान भालेराव, जगदीश गायकवाड, सीमाताई आठवले, झरीन खान सन्मानित

मुंबई(प्रतिनिधी)- भारताने जगाला भगवान बुद्धांचा दया, शांती व करुणेचा संदेश दिला. बुद्ध धर्माचा पुढे चीन, जपान, श्रीलंका आदी अनेक देशात प्रचार-प्रसार झाला. भारत ही भगवान बुद्धांची भूमी असून भारताने सर्व धर्मियांचे येथे स्वागत केले. भगवान बुद्धांच्या विचारांनी प्रेरित होऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कठीण परिस्थितीत उच्च शिक्षण घेऊन आपले जीवन लोक कल्याणासाठी व्यतीत केले. भगवान बुद्ध व डॉ.आंबेडकरांचे आदर्श पुढे ठेवून समाजाने एकदिलाने कार्य केले तर कोरोनासारखे कोणतेही संकट आले तरीही ते पराभूत होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

युनायटेड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट फाऊंडेशनेच्या वतीने राजभवन येथे लोकसेवा गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले व फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप जगताप उपस्थित होते.कोरोना महामारी कधी संपूर्णपणे जाईल हे सांगणे कठीण आहे असे सांगून कोरोनाला हरवून लोकांना जगवायचे ध्येय्य ठेवून कार्य केले पाहिजे असे उद्गार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले. यावेळी त्यांनी काव्याच्या माध्यमातून कोरोना योद्ध्यांचे अभिनंदन केले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी आमदार गणपत गायकवाड, उल्हासनगरचे उपमहापौर भगवान भालेराव, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, रामदास आठवले यांच्या पत्नी सीमाताई रामदास आठवले, इंग्लंड येथील हरबन्स विर्डी, अभिनेत्री डॉ.झरीन खान, यांचेसह 35 कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. प्रदीप जगताप संपादित दैनिक लोकधारा टाइम्सच्या करोना विशेषांकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आरेतील एकाही वृक्षाला धक्का न लागू देता चाचण्या पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Next Post

एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांनी स्वीकारला वायुदल प्रमुखाचा पदभार

Next Post
महाराष्ट्राचे सुपुत्र एअर मार्शल विजय चौधरी नवे वायुदल प्रमुख

एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांनी स्वीकारला वायुदल प्रमुखाचा पदभार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d