Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

युनिटी ऑफ नेशन फाऊंडेशनच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/08/2022
in राज्य
Reading Time: 1 min read


जळगाव – (प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृतमहोत्सवा निमित्त युनिटी ऑफ नेशन फाउंडेशनच्यावतीने अयोध्या नगर येथे अध्यक्ष लतेश चौधरी व सचिव चैतन्य ( गुड्डू ) कोल्हे यांच्या नेतृत्वात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर कार्यक्रमास उपस्थित सैनिकांच्या व मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला . भारतीय स्वातंत्र्याचे हे ७५ वे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने ७५ सैनिकांचा व पोलिसांचा मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या चरित्रपुस्तक व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला . तसेच कार्यक्रमाअंतर्गत ७५ गोमातांचे लसीकरण , ७५ विद्यार्थ्यांना मुखपृष्ठावर राष्ट्रपुरुषांचे चित्र व माहिती असणाऱ्या वह्या वाटप व राष्ट्रपुरुषांच्या चरित्र पुस्तकाचे वाटप , ७५ गरजू महिलांना साडी वाटप , ७५ वृक्षारोपण , ७५ कामगारांची ई श्रम कार्ड नोंदणी , ७५ दीप प्रज्वलित करून भारत देशासाठी शाहिद झालेल्या सर्व शाहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन व्यासपीठावर सैनिकांतर्फे खान्देश रक्षक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटिल , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदिप सुरळकर उपस्थित होते तसेच नगरसेवक सुनीलदादा खडके , नगरसेवक डॉ. विरणभाऊ खडके , नगरसेविका सौ. रंजनाताई वानखेडे , महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे , छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , सामाजिक कार्यकर्ते हर्षलभाऊ मावळे , युवा सामाजिक कार्यकर्ते पियुषभाऊ कोल्हे , माजी नगरसेवक प्रदीपभाऊ रोटे , युवासेनेचे शंतनु नारखेडे आदि उपस्थित होते . मनोगत व्यक्त करतांना संदिप सुरळकर यांनी सैन्यातील त्यांचे अनुभव कथन करत सैनिकांची व त्यांच्या कुटुंबीयांची मनस्थिती विषयी संवाद साधला यावेळी सर्व उपस्थित भावुक झाले , तर मुकुंद सपकाळे यांनी उपस्थितांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्ताने शुभेच्छा दिल्या तसेच हे राष्ट्र समता , बंधुता व सार्वभौम लोकशाहीच्या मार्गाने चालविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य असुन हिच शाहिदांना आपली श्रद्धांजली आहे असे सांगितले .
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युनिटी ऑफ नेशन फाउंडेशनचे कुणाल सोनार , कल्पेश पाटील , बबलू मराठे , विशाल चौधरी , धनंजय पाटील आदि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन गिरणा पुनर्जीवन अभियानाचे प्रमुख विजय कोळी सर यांनी केले .

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त लोहारा येथील डॉ. पंडित विद्यालयात 100 वृक्षांचे वृक्षारोपण

Next Post

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगर तर्फे मोटरसायकल मशाल तिरंगा रॅली संपन्न

Next Post

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगर तर्फे मोटरसायकल मशाल तिरंगा रॅली संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d