Wednesday, October 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

युवा परिषदेच्या नवनियुक्त भडगाव तालुका पदाधिका-यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न; वृक्षारोपणासह धान्य व जिवनावश्यक वस्तूंचे केले वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
युवा परिषदेच्या नवनियुक्त भडगाव तालुका  पदाधिका-यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न; वृक्षारोपणासह धान्य व जिवनावश्यक वस्तूंचे केले वाटप


भडगाव(प्रतिनिधी)- देशातील तरुणाईला दिशादर्शक असणारी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी विविध उपक्रम राबवणारी नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडिया अर्थातच भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेची पुढील १ वर्षासाठी भडगाव तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून सदर भडगाव कार्यकारणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ ‘सहवास’ (विशेष मुलांचे निवासी संकुल) वनकोठे (एरंडोल) येथे शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करुन निवडक लोकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

सहवास संकुलास युवा परीषदेच्या माध्यमातून जिल्हा उपाध्यक्षा दिव्या भोसले व जिल्हा समन्वयक स्वप्निल निकम यांच्या वतीने सामाजिक दायित्वातून धान्य व विद्यार्थ्यांना दैनंदिन वापरातील जिवनावश्यक वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या व सहवास प्रकल्पाचे प्रमुख समाधान सावंत यांचा सेवा कार्याप्रित्यर्थ युवा परीषदेच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील व जिल्हा समन्वयक नेहा मालपूरे यांनी कृतज्ञतापूर्वक सन्मान केला.विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी अर्चना पाटील, प्रतिक्षा सोनवणे व प्रेरणा पाटील यांनी सुरेल असे स्वागतगीत सादर केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष प्रतिक पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील होते तर प्रमूख पाहुणे जिल्हाध्यक्ष अनिल बाविस्कर, सहवास प्रकल्पाचे प्रमुख समाधान सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश जावळे, दिव्या भोसले, जिल्हा महासचिव सागर महाजन, जिल्हा कोषाध्यक्ष शुभम पाटील, जिल्हा सचिव आकाश पाटील, आकाश धनगर, कोमल पाटील, जिल्हा समन्वयक इरफान पिंजारी, भावेश रोहीमारे, स्वप्निल निकम, विद्या कोळी, नयनकुमार पाटिल, नेहा मालपुरे, सागर महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त तालुकाध्यक्ष प्रतिक पाटील, उपाध्यक्ष चेतन राजपुत, महासचिव अश्विनी सोमवंशी, बांबरुड राणिचे येथिल युवा आदर्श  व प्रयोगशिल शेतकरी सचिव मयूर अरुण वाघ, कृष्णा भोसले , प्रतिक्षा सोनवणे, कोषाध्यक्ष अमोल पाटील, समन्वयक यश शिंपी, ललित पाटील, दर्शना गोसावी, प्रेरणा पाटील, अर्जुन पवार, अर्चना पाटील या पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र, मास्क व माहिती पत्रक प्रदान करुन सन्मानित करण्यात आले, तसेच सहवास प्रकल्पाच्या परिसरात युवा परीषदेच्या वतीने वृक्षारोपण करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्विकारण्यात आली. यावेळी युवा शिवव्याख्याते हर्षल पाटील(पाचोरा) यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका महासचिव अश्विनी सोमवंशी यांनी केले तर तालुका सचिव प्रतीक्षा सोनवणे यांनी आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अंथरुणाला खिळून (बेड रिडन) असलेल्या रुग्णांसाठी आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची सुविधा

Next Post

राजेश पाटील- आमदार किशोर अप्पांचे निष्ठावान स्वामीभक्त

Next Post

राजेश पाटील- आमदार किशोर अप्पांचे निष्ठावान स्वामीभक्त

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo