जळगाव, दि.30 (जिमाका) : “राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण योजना” अंतर्गत अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थी व पालकांना इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे की, बियाणी पब्लिक स्कूल, भुसावळ (जि. जळगाव) या शाळेतील इयत्ता चौथीच्या प्रवेशासाठी उपलब्ध रिक्त जागांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यामुळे प्रवेशासाठी सोडत पद्धतीने निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

ही सोडत/ लॉटरी दि. ३ ऑगस्ट २०२६, सोमवार रोजी सकाळी ११.३० वाजता तिसरा मजला, सभागृह (प्रशासकीय इमारत), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, जळगाव येथे होणार आहे.

या सोडत प्रक्रियेसाठी अर्ज केलेले सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विशाल राठोड, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जळगाव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.








