Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्यातील कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यासाठी नियोजन करण्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे निर्देश

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
22/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
राज्यातील कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यासाठी नियोजन करण्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे निर्देश

मुंबई(प्रतिनिधी)- राज्यातील हंगाम २०२१-२२ मधील कापूस खरेदीचे योग्य नियोजन करून शेतकरी हितासाठी कापूस खरेदीला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरूवात करावी त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या.हंगाम २०२१-२२मधील कापूस खरेदी नियोजनाबाबत सहकार व पणन मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली.

राज्यात खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये ३९.३७ लाख हेक्टरवर कापसाचा पेरा झालेला आहे. मागील वर्षी ४२.०८ लाख हेक्टरवर कापसाचा पेरा झालेला होता. यावर्षी कापूस पेरा ६.४४ टक्के घटला असली तरी सद्यस्थितीत कापूस पिकाची परिस्थिती समाधानकारक आहे. त्यानुसार राज्यात ८०-८५ लाख गाठी एवढे उत्पन्न अपेक्षित आहे. त्यानुसार योग्य नियोजन करून खरेदीकेंद्र नोव्हेंबरमध्ये सुरू करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत करावी आणि या केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात यावेत, असेही श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.ज्या तालुक्यात सर्वाधिक कापूसपेरा आहे तिथे प्रत्यक्ष खरेदी लवकर सुरू करण्यासाठीचे नियोजन करावे. शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य नियोजन करून कापूस खरेदी करावी, असेही श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीला सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, सहकारी कापूस पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण उन्हाळे, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे संचालक सतीश सोनी, सीसीआयचे जनरल मॅनेजर अतुल काला, संजय पाणीग्रही व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय -पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

Next Post

पर्यावरण जीवन पद्धतीची आज आवश्यकता -डॉ. भालचंद्र नेमाडे

Next Post
पर्यावरण जीवन पद्धतीची आज आवश्यकता -डॉ. भालचंद्र नेमाडे

पर्यावरण जीवन पद्धतीची आज आवश्यकता -डॉ. भालचंद्र नेमाडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo