Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रावेर तालुक्यातील कुसुंबा येथील वाघेश्वरी भवानी माता

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
13/10/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
रावेर तालुक्यातील कुसुंबा येथील वाघेश्वरी भवानी माता

रावेर(कमलाकर माळी)- तालुक्यातील कुसुंबा येथील वाघेश्वरी भवानी मातेचे एक जागृत देवस्थान आहे सातपुड्याच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य असा वातानुकूलित परीसरात असलेले हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते हे रावेर पासून १३ किमी अंतरावर आहे. तर सावदा तसेच वेगवेगळ्या मार्गाने या मंदिरावर येण्यासाठी रस्ते आहेत. कुसुंबा गावापासून २ किमी अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याला लागुन असलेल्या या मंदिरात आई भवानीची मूर्ती हि स्वयंभू असून भक्तांच्या नवसाला पावणारी आहे.

मुख्य मूर्तीच्या गाभार्‍याच्या खालील बाजूस एक पाण्याचा झरा आहे.अनादी काळापासून आज ही तो भरलेला आहे.हे स्थान गुप्त गोदावरी म्हणून ही ओळखले जाते. सन १९५८ मध्ये तोताराम सदा पवार यांनी मंदीराचा दुसऱ्यांदा जिर्णोद्धार केला.

सन १९८७ मध्ये भक्तांच्या मदतीने संतोष दासजी महाराज व एकनाथ दासजी महाराज सेवा करत होते. त्यांनी मंदीराचा सन २००२ साली मंदीराचा मोठा जिर्णोद्धार केला. आता विजयदासजी महाराज यांना मातेने सेवा करण्याची संधी दिली आहे.व ते या बरोबर गोसेवा पालन करून गोशाळा साठी प्रयत्न करत आहे.

आईने अनेक भक्तांना दृष्टांत दिले आहेत या परिसरातील भाविकांचे अशी श्रद्धा आहे येथील झिराचे पाणी तीर्थ गंगेचे असून या तीर्थ पाण्याने स्नान केल्यास किंवा प्राशन केल्यास सर्व व्याधींचा नाश होतो व अध्यात्मिक वृद्धि होते श्री वाघेश्वरी भवानीमातेचे परमभक्त श्री एकनाथ दास जी महाराज यांनी २४ वर्षे अग्नी तपश्चर्या करून मुख्य मूर्तीच्या वरील बाजूस गुप्त गोदावरी शोधून काढली आहे व या तीर्थाच्या पाण्याने मंदिर परिसर हिरवागार झाला असून मंदिरातील पाण्याचा प्रश्नही मिटला आहे या वाघेश्वरी भवानीमातेची दरवर्षी पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा या दिवशी मोठी यात्रा भरते येथे संपूर्ण परिसरातील राज्यातील भाविक दर्शनासाठी येतात तसेच यात्रा काळात नवस पूर्ण करणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते .तसेच मातेची ओटी ही भरली जाते.

येथील भैरंबुवा राक्षसाचे एक कथा ही आहे बैंरबुवा नावाचा एक राक्षस होता त्याने देवीस तू माझ्यासोबत लग्न कर अशी देवीला गळ घातली देवीने नकार दिल्यावर त्याने देवीच्या भक्तांना त्रास द्यायला सुरुवात केली भक्तांच्या संरक्षणासाठी देवीने त्या राक्षसाला होकार दिला व अट घातली की उद्याचा सुर्योदय होण्याच्या आधी तू माझ्याशी विवाह कर राक्षस आनंदात आपल्या नगरात गेला व संपूर्ण वराती सह तो निघाला रात्री तो मंदिरापासून काही अंतरावर येऊन पोहोचला व विचार करू लागला सूर्योदय होण्यास अजून खूप उशीर आहे म्हणून थोडी विश्रांती घेऊया खूप वेळ प्रवास झाल्याने त्यांना झोप लागली मग सुर्योदय झाला तर संपूर्ण वरात व तो राक्षस यांची (शीळा)दगड झाले आजही मंदिरापासून सुमारे दोन किमी अंतरावर नगरकाठी या गावी ते शिळा दगड पाहावयास मिळतात येथे आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी भक्त नवस मानतात व तेथे सध्या मंदिराचे पुजारी विजयदाजी महाराज हे काम पाहत आहे.आपणही परीवारासोबत दर्शनाचा लाभ घ्यावा.

कमलाकर माळी(मोठे वाघोदा. ता रावेर)

मो.नं ९६३७३९२६२८

Team Satymev Jayate

Previous Post

“पूर्ण लसीकरण”च्या व्याख्येत सुधारणा

Next Post

सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेला “स्नेहबंध आदर्श संस्था” पुरस्कार जाहीर

Next Post
सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेला “स्नेहबंध आदर्श संस्था” पुरस्कार जाहीर

सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेला "स्नेहबंध आदर्श संस्था" पुरस्कार जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo