Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रावेर, यावल तालुक्यातील सर्व कुटूंबांचे होणार सर्वेक्षण अचूक माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
रावेर, यावल तालुक्यातील सर्व कुटूंबांचे होणार सर्वेक्षण अचूक माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांचे आवाहन

जळगाव, दि. 14 (जिमाका) – कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेतला नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी रावेर व यावल तालुक्यातील कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश हा अतिजोखीम असलेल्या व्यक्तींना होणारा करोनाचा प्रादुर्भाव रोखणे हा आहे. या सर्व्हेक्षणामध्ये कुटुंबातील 60 वर्षावरील, दहा वर्षाखालील बालके,गरोदर स्त्रीया तसेच विविध व्याधीने ग्रस्त असलेले जसे-मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, फुफुसाचे आजार असलेल्या व्यक्तींची माहिती जमा केली जाणार असल्याची माहिती फैजपुरचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरेबोले यांनी दिली आहे.
या सर्व्हेक्षणामध्ये कुटुंबप्रमुखाचा संपर्क क्रमांक घेतला जाणार आहे. हे सर्वेक्षण दोन्ही तालुक्यातील सर्व गावांत व शहरातही केले जाणार आहे. यासाठी शिक्षक, आरोग्यसेवक, आशावर्कर, अंगणवाडी सेविका यांची नियुक्ती केली गेली असून हे सर्वेक्षण आठ दिवस चालणार आहे. तरी रावेर व यावल तालुक्यातील नागरिकांनी आपल्याकडे सर्वेक्षणासाठी येणाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करावे. जेणेकरून करोनापासून आपले व आपल्या कुटूंबातील व्यक्तींचा बचाव करण्यास मदत होईल.
सर्वेक्षण केलेल्या घरी याप्रमाणे व्यक्ती असल्यास त्यांना दूरध्वनी करुन संबंधित व्यक्तीच्या आरोग्याची दैनंदिन माहिती घेतली जाणार आहे. तरी नागरिकांनी आपल्या कुटूंबाची अचूक माहिती सर्व्हेक्षण टीमला द्यावी. व कोरोनाच्या लढाईत प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांनी केले आहे
.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जामनेर शहरातील गारखेडे गावाजवळ आयशर गाडीचा अपघात १२ जण जखमी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल

Next Post

वावडदा येथे राजपुत संमाजाचा आदर्श विवाह संपन्न

Next Post
वावडदा येथे राजपुत संमाजाचा आदर्श विवाह संपन्न

वावडदा येथे राजपुत संमाजाचा आदर्श विवाह संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo