Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रीय पातळीवर जळगावचे नाव उंचावत मोक्षदा ठरली रोल मॉडेल – डॉ.उल्हास पाटील दैदिप्यमान यशप्राप्तीसाठी मोक्षदा चौधरीवर अभिनंदनाचा वर्षाव

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/02/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
राष्ट्रीय पातळीवर जळगावचे नाव उंचावत मोक्षदा ठरली रोल मॉडेल – डॉ.उल्हास पाटील दैदिप्यमान यशप्राप्तीसाठी मोक्षदा चौधरीवर अभिनंदनाचा वर्षाव

जळगाव – अथक परिश्रमाने दिल्‍ली गाठत आर्मीच्या निगराणीखाली प्रशिक्षण घेत नुकत्याच झालेल्या २६ जानेवारी या प्रजासत्‍ताक दिनाच्या परेडीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून, महाराष्ट्रातून एक नंबर ठरलेली मोक्षदा ही आज तमाम मुलींसाठी रोल मॉडेल ठरली असून या दैदिप्यमान यशप्राप्तीसाठी मोक्षदाचे अभिनंदन करतांना आज अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी केले.
जळगाव येथील मोक्षदा चौधरी हिची १८ महाराष्ट्र एनसीसी बटालियन अंतर्गत निवड होऊन तिने नुकत्याच झालेल्या प्रजासत्‍ताक दिनाच्या सोहळ्यात उत्कृष्ट सादरीकरण केले. राष्ट्रीय पातळीवरच्या सोहळ्यातील सहभागाबद्दल शुक्रवार, ४ रोजी ज्ञानदेव नगरातील निवासस्थानी तिचा कौतुक समारंभ आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम ढोल-ताशांच्या गजरात तिची मिरवूणक काढण्यात आली. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांची विशेष उपस्थीती होती. पुढे बोलतांना डॉ.पाटील म्हणाले की, मोक्षदा ही लहानपणापासून अंत्यंत हुशार गुणी मुलगी आहे. यंदाच्या परेडमध्ये तिने सहभाग नोंदवून राज्याचे नाव उंचावले आहे. जळगावाला भुषण वाटावं असं कार्य मोक्षदाने केले आहे. प्रत्येकामध्ये विविध कला गुण असतात, ते कसे प्रदर्शित करावे आणि त्यासाठी कुटूंबाचे सहकार्य हे खुप गरजेचे असते, मोक्षदाला तिचे वडिल मधुकर पाटील, आई संगीता चौधरी, आजी-आजोबा, काका एन.जी.चौधरी आदिंचे सहकार्य लाभले आणि मोक्षदानेही मिळालेल्या संधीचे सोने केल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ.प्रशांत वारके, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ.व्ही.एच.पाटील, नरेंद्र पाटील, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील एन.जी.चौधरी, प्रा.स्मिता चौधरी, नर्सिंगच्या मनिषा खरात आदिंची उपस्थीती होती. स्वागत रॅलीप्रसंगी जळगावच्या महापौर जयश्री महाजन, सामाजिक कार्यकर्त्या सरिता माळी आदिंनी मोक्षदाला पुष्पगुच्छ देत अभिनंदनाचा वर्षाव केला.
आनंद वाटतोय मोक्षदा आणि आम्ही तीन वर्षापासून परेडची प्रॅक्टीस करतो, आमच्यापेक्षाही मोक्षदाने खुप जास्त मेहनत घेतली आणि अखेरीस दिल्‍ली परेडमध्ये तिने सहभाग नोंदविल्याने खुप आनंद वाटत आहे, त्याल शब्दात व्यक्‍त करता येत नसल्याचे मोक्षदाच्या मैत्रिणींनी सांगितली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महविद्यालयात एमबीबीएस पहिल्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

Next Post

कानळदा विद्यालयास पालकमंत्री श्री.गुलाबराव पाटील यांची सदिच्छा भेट

Next Post
कानळदा विद्यालयास पालकमंत्री श्री.गुलाबराव पाटील                                         यांची सदिच्छा भेट

कानळदा विद्यालयास पालकमंत्री श्री.गुलाबराव पाटील यांची सदिच्छा भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo