Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रिक्तपदांची माहिती महास्वयंम पोर्टलवर अधिसूचित करणे अनिवार्य-जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 18 (जिमाका) – सक्तीने पदे अधिसूचित करणारा कायदा (Compulsory Notification Of Vacancies Act) 1959 या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आदेश अपर मुख्य सचिव, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी दिले आहे.

 राज्य शासनाच्या सेवायोजन कार्यालयातंर्गत रिक्तपदे अधिसूचित करणेबाबतचे नियम 1 मे, 1960 पासून अंमलात आले आहे. तथापि बऱ्याच शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांकडे 25 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असतानासुध्दा त्या आस्थापना त्यांच्याकडील रिक्तपदे वृत्तपत्रात जाहिरात प्रसिध्द करून थेट नियुक्तीद्वारे पदे भरतात. याबाबत सेवायोजन कार्यालयास कोणतीही सूचना दिली जात नाही.

25 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती महास्वयंम या पोर्टलवर अधिसूचित करणे आवश्यक असतानाही संबंधित आस्थापनांकडून योग्य ती कार्यवाही केली जात नाही. या कायद्यान्वये अशा आस्थापनांना किमान 500 व कमाल एक हजार रुपये इतक्या रकमेच्या दंडाची तरतूद आहे.

या कायद्यातील तरतुदीची कडक अंमलबजावणी  केल्यास राज्यातील बेरोजगार उमेदवारांस नियुक्ती मिळण्यास मदत होईल, असा सकारात्मक दृष्टीकोन समोर ठेवून कायद्याची अंमलबजावणी सर्वच आस्थापनांनी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नुकसानग्रस्त पीकांचे सरसकट पंचनामे करण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

Next Post

तळेगाव ,सावरला परिसरात मुसळधार पाऊस गारपीट व वादळांमुळे रब्बीचे मोठ्याप्रमाणात नुकसान

Next Post

तळेगाव ,सावरला परिसरात मुसळधार पाऊस गारपीट व वादळांमुळे रब्बीचे मोठ्याप्रमाणात नुकसान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo