Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लाच स्वीकारताना कराड भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यासह खासगी व्यक्तीला अटक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/07/2019
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
लाच स्वीकारताना कराड भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यासह खासगी व्यक्तीला अटक

सातारा-(प्रतिनिधी) – येथील घराबाबत केलेल्या हक्क सोड पत्र दस्ताची नोंद करुन तसा उतारा देण्यासाठी 1500 हजार रुपयांची लाच मागून ती खासगी व्यक्तीकडून स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने भूमी अभिलेख कार्यालय, कराड येथे छापा टाकला. याप्रकरणी वर्ग- 2 च्या अधिकार्‍यासह एका खासगी व्यक्तीला अटक केली.

गोविंद सुभाष बेलवणकर (वय 47, रा.कार्वे नाका, कराड), ताजुद्दीन इब्राहिम शिकलगार (वय 71, रा. रेठरे बु. ता.कराड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. यातील ताजुद्दीन शिकलगार हा खासगी व्यक्ती आहे.याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार हे कराड परिसरातील आहेत. तक्रारदार यांना घराबाबत केलेल्या हक्क सोड पत्र दस्ताची नोंद करुन तसा उतारा पाहिजे होता. यासाठी ते कराड कार्यालयातील गोविंद बेलवणकर याला भेटले. संबंधित कामासाठी तक्रारदार याला 2 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी याप्रकरणी सातारा एसीबी विभागात 20 रोजी तक्रार केली. तक्रार दाखल झाल्यानंतर त्याची पडताळणी केली असता लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.2 हजार रुपयांच्या लाचेबाबत तक्रारदार यांनी संशयितांना भेटून रक्कम कमी करण्याची विनंती केली असता 1500 रुपयांची तडजोड झाली. लाचेची रक्कम सोमवारी घेण्याचे ठरल्यानंतर एसीबी विभागाने सापळा रचला. लाचेची रक्कम खासगी व्यक्ती ताजुद्दीन शिकलगार याने स्वीकारली. ही रक्कम कराड येथील मोकळ्या जागेत स्वीकरली. लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर एसीबी विभागाने त्याला रंगेहाथ पकडले. ट्रॅप झाल्याची माहिती पसरताच कराडमध्ये खळबळ उडाली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माहिती अधिकार कार्यकर्ते यांचा राळेगणसिद्धी येथुन मा.आण्णा हजारे यांच्या उपस्थितीत भ्रष्टाचार विरुद्ध एल्गार

Next Post

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर २५ जुलै रोजी जिल्हा दौऱ्यावर

Next Post
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर २५ जुलै रोजी जिल्हा दौऱ्यावर

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर २५ जुलै रोजी जिल्हा दौऱ्यावर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo