Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लेखांक १. मूल होत नाही? जबाबदार कोण?

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/09/2019
in राष्ट्रीय, लैंगिक शिक्षण
Reading Time: 1 min read
लेखांक १. मूल होत नाही? जबाबदार कोण?

आपल्या समाजात मूल नसलेल्या स्त्रीला वांझ किंवा वांझोटी म्हटलं जातं आणि तिला नापीक जमिनीची उपमा देण्यात येते. स्त्रीचं शरीर हे शेत आणि पुरुषाचं बीज त्यात रुजून फळतं ही यामागची संकल्पना आहे. पण मुळात ही संकल्पनाच चुकीची आहे. कारण गर्भधारणेमध्ये, बीज फळण्यामध्ये स्त्री बीजही असतं आणि फलित गर्भाचा अर्धा हिस्सा हा स्त्री बीजाचा असतो.

पण स्त्रीला मूल होत नसलं तर ती एक स्त्री म्हणून आणि एक पत्नी म्हणून तिच्या कर्तव्यात कमी पडली, असंच सर्वांना वाटतं. मूल न होणाऱ्या स्त्रीला भुताली, चेटकीण ठरवून इतरांवर करणी केल्याचे घाणेरडे आरोप तिच्यावर लावले जातात. मूल नसलेल्या पुरुषाला मात्र नामर्द असं हिणवलं जातं. हे लक्षात घेऊन आपणही बोलताना साध्या सरळ शब्दात मूल होत नाही असा उल्लेख करावा. कोणत्याही परिस्थितीत त्यांना वांझ म्हणू व समजू नये.मूल न होणे ही मोठी समस्या आहे. जवळ जवळ १० % जोडप्यांमध्ये आढळून येते आणि आरोग्यसेवांनी तिची पुरेशी दखल घ्यायला पाहिजे. मूल न होण्यासंबंधीची कारणं पाहता जोडप्यातील दोघांमध्ये किंवा दोघांपैकी एकामध्ये काही शारीरिक घटक जबाबदार असल्याचं आढळून येतं.

याशिवाय त्यांच्या नात्यात आणि शारीरिक संबंधांतही काही अडचणी असू शकतात. लैंगिक संबंध आणि गर्भधारणा याविषयी अपुरी माहिती तसंच स्त्रीच्या पाळीचक्रातील जननक्षम दिवसांची माहिती नसल्याने त्या काळात संबंध न येणं अशी कारणंही यासाठी जबाबदार असतात. या समस्या सोडवल्या तर मूल होऊ शकतं. वैद्यकीय क्षेत्रात आता बरीच प्रगती झालेली आहे, नवनवीत पद्धती सध्या वापरात आहेत. त्यांंचे रिझल्टही सकारात्मक आहेत.  पण कधी कधी कुठल्याच उपायाने शारीरिक समस्या सुटत नाही. अशा वेळी मूल दत्तक घेणे हा सर्वात उत्तम पर्याय असू शकतो. कारण मूल वाढवणं आणि त्याचं संगोपन केवळ रक्ताशी संबंधित नाही.

हे नेहमी लक्षात ठेवा

  • मूल होत नसल्यास केवळ स्त्री जबाबदार नसते तर पुरुषामध्येही काही कारणं असू शकतात.
  • मूल होत नसल्यास ४०% कारणं स्त्रीशी संबंधित असतात. २५% कारणं पुरुषांशी संबंधित असतात. २०% दोघामध्ये दोष असतो व १५% कारण समजत नाही.
  • मूल न होणं हे पाप किंवा कुठल्याही चुकीची शिक्षा नाही.
  • शारीरिक कारणांवर वैद्यकीय उपाय केल्याशिवाय मूल होऊ शकत नाही. डॉक्टरचा सल्ला व उपचार आवश्यक असतो.

पुढील भागात आपण मूल होण्यासाठी काय काय उपाय उपलब्ध आहेत याबाबत माहिती घेऊयात .

 ‘स्रोत – तथापि ट्रस्ट निर्मित Let’s Talk Sexuality – सेक्स आणि बरंच काही’ 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पाणी बचतीसाठी सजग व्हा – एन. एम. पाटील

Next Post

काँग्रेससोबत युती करणार नाही: प्रकाश आंबेडकर

Next Post

काँग्रेससोबत युती करणार नाही: प्रकाश आंबेडकर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo